Suhani Bhatnagar Death : 'आमिरनं आमच्या मुलीला लक्षात ठेवले हीच मोठी गोष्ट'! 'दंगल' फेम सुहानीच्या आईला अश्रू अनावर

दंगलमधील बालकलाकार सुहाना भटनानगरच्या (Suhani Bhatnagar Death) कुटूंबियांची आमिर खाननं भेट घेतली आहे.
aamir khan latest news
aamir khan latest newsesakal
Updated on

Aamir Khan Meets Dangal Actor Suhani Bhatnagar Parents: बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटाचा सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत आवर्जुन सहभाग केला जातो त्या दंगल चित्रपटातील एका बालअभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची (Suhani Bhatnagar Death)बातमी समोर आली होती. सुहानी भटनानगर असे तिचे नाव होते.

दंगलमध्ये सुहानीनं छोट्या बबिता फोगाटची भूमिका केली होती. तिच्या (Dangal Movie news) निधनानं अनेकांना मोठा धक्का बसला होता. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सुहानीचं निधन झालं होतं.

सुहानीच्या घरी पोहचला आमिर खान...

दंगलमधील बालकलाकार सुहानी भटनानगरच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. १६ फेब्रुवारी रोजी तिचं निधन झालं होतं. यानंतर (Aamir Khan Suhani Home Visit) आता आमिर खाननं तिच्या फरिदाबाद सेक्टर १७ मध्ये जाऊन तिच्या कुटूंबियांची भेट घेतली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आमिर खान आमच्या घरी आले हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट...

सुहानी भटनानगरनं दंगलमध्ये छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. तिच्या निधनानंतर आमिर खाननं तिच्या घरी जाऊन कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. यापूर्वी दंगलच्या टीममधील अनेक कलाकारांनी भटनानगर कुटूंबियांना भेटून त्यांना आधार दिला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

aamir khan latest news
Kangana Ranaut : ट्विंकलनं केली पुरुषांची तुलना 'प्लॅस्टिकच्या बॅग' सोबत, कंगनाची आगपाखड! म्हणाली, 'जे चांदीचा चमचा घेऊन...'

आमिर खाननं सुहानीच्या फोटोला फुलं वाहत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. आमिरनं यावेळी म्हटलं आहे की, मी भटनानगर कुटूंबियांच्या सोबत आहे. त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग खूपच विदारक आहे. सुहानीच्या आईनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मुलीला आमिर यांनी लक्षात ठेवले हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

aamir khan latest news
Malia Obama changed name : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या लेकीनं बदललं नाव; काय आहे कारण?

कसा झाला होता मृत्यू?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असं म्हटलं जातं की, मृत्यूपूर्वी सुहानीचा अपघात झाा होता. तिच्यावर उपचारही सुरु होते. मात्र ती घेत असलेल्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे तिला प्राण गमवावे लागले. त्या औषधांमुळे तिच्या शरीरात पाणी झाले होते. तिच्या निधनानं सोशल मीडियावर वेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.