Aamir Khan Daughter: लेकीला मिळाला हा मोठा पुरस्कार! जावई आणि पुर्वपत्नीसह आमिर खान उपस्थित

आमिर खानच्या लेकीला मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहच्या हस्ते खास पुरस्कार मिळालाय
aamir khan daughter ira khan got CSR Journal Excellence Awards aamir praise daughter
aamir khan daughter ira khan got CSR Journal Excellence Awards aamir praise daughterSAKAL
Updated on

Aamir Khan Daughter News: आमिर खानची लेक इरा लवकरच बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या इराची लगीनघाई सुरु आहे. अशातच इराला लग्नाआधीच एक आनंदाची बातमी मिळालीय. इराला CSR जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स मिळालाय. या खास पुरस्कार सोहळ्यात लेकीचं कौतुक करताना आमिर खान दिसला होता.

aamir khan daughter ira khan got CSR Journal Excellence Awards aamir praise daughter
Bigg Boss 17: लोकांनी दाखवला बाहेरचा रस्ता! सना खानचा बिग बॉसमधला प्रवास संपला

आमिर सहकुटुंब परिवारासह उपस्थित

CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी या पुरस्कार सोहळ्याचं काल वितरण झालं. आमिरची लेक इराला हा पुरस्कार मिळाला.

इरा जेव्हा पुरस्कार घ्यायला मंचावर गेली तेव्हा आमिर, तिचा बॉयफ्रेंड नुपुर आणि आमिरची पुर्वपत्नी रीना दत्ता यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इरा पुन्हा आसनस्थ झाल्यावर आमिर तिला मिठी मारुन तिचं कौतुक करताना दिसला

आमिर खानचाही झाला गौरव

अलीकडेच CSR जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. या पुरस्कारांचं यंदाचं दहावं वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यात आमिर मुलगी इरा खानसोबत सहभागी होता.

या सोहळ्यात आमिर आणि इरा दोघांनाही पुरस्कार मिळाले. या दोघांना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

आमिर आणि इरा व्यतिरिक्त, या कार्यक्रमात भूमी पेडणेकर देखील उपस्थित होती. तिलाही पुरस्कार मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()