Ira Khan: 'लग्न आहे ना तुझं सिगारेट का ओढत बसलीये'? आमिरच्या लेकीचे नेटकऱ्यांनी ओढले कान!

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो.
Aamir Khan Daughter Ira Khan Nupur Shikhare
Aamir Khan Daughter Ira Khan Nupur Shikhare esakal
Updated on

Aamir Khan Daughter Ira Khan Nupur Shikhare: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या लेकीच्या आयराच्या लग्नामुळे लाईमलाईटमध्ये आला होता. आयराच्या वेडिंग रिसेप्शनला सारं बॉलीवूड आलं होतं. त्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आमिर खानच्या लेकीचं आयराचं आणि नुपूर शिखरेच्या लग्नाला देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजस्थानमधील उदयपुरमध्ये त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. त्यानंतर मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शनचे आय़ोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्यात आय़राच्या एका फोटोनं मात्र नेटकऱ्यांचा संताप झाला आहे.

आयराचा सिगारेट पितानाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोवरुन आय़रा ट्रोल होताना दिसत आहे. अमर उजालानं त्याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. त्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी आयराला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.आयरा त्या फोटोमध्ये सिगारेट ओढताना दिसत आहे. ती नववधूच्या वेषात असून तिनं त्यावेळी सिगारेट ओढणे हे अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो फोटो आयराच्या प्री वेडिंग शुटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरी देखील तिनं अशा आनंदाच्या प्रसंगी असे फोटो पोस्ट करणे चुकीचे असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. बाकीच्या फोटोंमध्ये ती तिची आई रिना दत्तासोबत पोझ देत असल्याचे फोटो आय़रानं शेयर केले आहे.

एका नेटकऱ्यानं त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आयरा तुझा हा फोटो कौतुक करावा असा नाही. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, तुला अशा प्रकारचा फोटो शेयर करुन नेमकं काय सांगायचे आहे हे काही कळलं नाही. तू आमिर खानची मुलगी आहेस तू असे वागणे तुला शोभत नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया आयराच्या फोटोंवर आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.