Aamir Khan: बॉलीवूडचे चित्रपट 'फ्लॉप' का होतात? आमिरनं कबूल केलं की...

तसं आमिर खानला स्वताच्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल तरच तो दुसऱ्याच्या शोमध्ये जाणं पसंत करतो. असं म्हटलं जातं.
Aamir Khan News
Aamir Khan News esakal
Updated on

Aamir Khan Movie News: तसं आमिर खानला स्वताच्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल तरच तो दुसऱ्याच्या शोमध्ये जाणं पसंत करतो. असे त्याच्याबद्दल म्हटले जाते. नाहीतर कोणत्या अॅवॉर्ड शोमध्ये असो वा मुलाखतीमध्ये भाग घेणे (Bollywod Actor) त्याला आवडत नाही. त्याचे काय आहे लाल सिंग चढ्ढाची जोरदार तयारी सुरु आहे. करण जोहरच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आमीर खान (Laal Singh Chaddha News) आणि त्याची सहअभिनेत्री करिना कपूर खान सहभागी झाले होते. यावेळी करणनं आमीरला वेगवेगळे प्रश्न विचारुन बोलतं करण्याचा प्रयत्न केला. अखेर करणनं त्याला एक प्रश्न विचारुन कोड्यात टाकण्याचा प्रयत्न करताच, आमीरनं एक गोष्ट कबूल केली. ती होती बॉलीवूडला सातत्यानं येणाऱ्या अपयशाविषयी.

करणनं आमीरला बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड या वादावर प्रश्न विचारला होता. करणनं विचारलं की, सध्याच्या घडीला बॉलीवूडचे चित्रपट का चालत नाहीत, दुसरीकडे टॉलीवूडचे चित्रपट तुफान कमाई करताना दिसत आहेत. असे का, पुष्पा, आरआरआर सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. यामागे नेमकं काय कारण, असा प्रश्न करणनं आमीरला विचारला होता. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर आता चर्चेत आलं आहे. गेल्या वर्षांपासून टॉलीवूडनं बॉलीवूडच्या चित्रपटांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. त्यात मागील वर्षी आलेल्या पुष्पानं सगळ्या चित्रपटांवर मात केली होती.

बॉलीवूडच्या काही मोजक्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. संजय लीला भन्साळी यांचा गंगबाई काठियावाडी, कार्तिक आर्यनचा भुलभुलैय्या 2 यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. याशिवाय बॉलीवूडधील बिग बॅनर चित्रपटांना घरघर लागल्याचे दिसून आले आहे. त्यात करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसमधील मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. यासगळ्या परिस्थितीवर आमीरनं दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Aamir Khan News
Video: 'आप्पी आमची कलेक्टर' नवीन मालिका

आमीर म्हणतो, मी असं म्हणत नाही की अॅक्शन फिल्म करु नका. मात्र काही चांगला आशय़ असणाऱ्या कलाकृती पुढे यायला हव्यात. तसे विषय निवडून आपल्याला काही तयार करावे लागेल. जर फिल्ममेकर जवळ विषय निवडीचे स्वातंत्र्य आहे तर त्यांनी त्याचा उपयोग करायला हवा. त्याचं काय आहे की, सध्या निर्माते, दिग्दर्शक अशा विषयांची निवड करत आहेत ज्यात लोकांना रस नाही. त्यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसादही कमीच आहे. मला वाटतं हे एक त्यामागील महत्वाचे कारण असावे.

Aamir Khan News
Laal Singh Chaddha वादात कंगनाची उडी; आमिर विरोधात बेताल वक्तव्य, म्हणाली..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.