Laal Singh Chaddha: ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमांमध्ये एक वेगळाच आनंद असतो. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा सिनेमात भारतात घडलेल्या त्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा केवळ उल्लेखच केला गेलेला नाही तर त्याचं फुटेजही दाखवलं गेलं आहे. आणि सत्य घटनांशी संबंधित नावांचा थेट उल्लेख केलेला आहे. सिनेमा याच घटनांच्या आधारे पुढे सरकताना दिसतो आणि एकानंतर एक येणाऱ्या संदर्भांवरनं सिनेमा आपल्याला समजत जातो,आपण त्या त्या काळाशी त्या-त्या व्यक्तिरेखांचा संदर्भ जोडत जातो.(Aamir Khan Laal Singh Chadha captures famous historical events)
1. इमरजन्सी(आणीबाणीचा काळ)- आणीबाणीचा काळ सिनेमात दाखवला आहे त्यावेळी लाल सिंग हा खूप लहान असतो. तो नुकताच चालायला शिकत असतो, तेवढ्यात रेडिओवरनं आणीबाणी संपल्याची घोषणा होते.
2. ऑपरेशन ब्ल्यू स्टार: लाल सिंग आपल्या आईसोबत मावशीकडे गेलेला असतो. तिथे त्याला बॉम्बस्फोट आणि गोळ्यांचे आवाज ऐकायला येतात. तेव्हा त्याला घरातनं ताकिद दिली जाते की अशा भयानक प्रसंगी घरातून बाहेर पडणं योग्य नाही. आणि हि ताकिद आयुष्यभर त्याच्या लक्षात राहते.
3. भारतानं जिंकलेला पहिला वर्ल्ड कप- याच आनंदाच्या क्षणी सिनेमात लाल सिंग चड्ढा आपली मैत्रिण रुपाला लग्नासाठी मागणी घालतो.
4. इंदिरा गांधी यांची हत्या- या प्रसंगी लाल सिंग चड्ढा आपल्या आईसोबत दिल्लीत असतो. तो जिथे असतो तिथून काहीच अंतरावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो.
5. 1984 सालातले शीख दंगल- सिनेमात लाल सिंग चड्डा करौलीला जाण्यास निघालेला असतो. तेव्हा वाटेत त्याचा आणि त्याच्या आईचा दंगलखोरांशी सामना झालेला दाखवण्यात आलेला आहे.
6. रथयात्रा- या सिनेमात या निमित्तानं लालकृष्ण अडवाणी देखील दिसतात. याचे रिअल फूटेज वापरण्यात आलेलं आहे. त्यांच्या नावाचा उल्लेखही सिनेमात केला गेलेला आहे.
7. मंडल कमिशन: लाल सिंग चड्ढा दिल्लीत आपलं शिक्षण घेत असतो. तेव्हा त्याचं कॉलेज बंद केलं जातं कारण मंडल कमीशनचा विरोध तेव्हा सुरु असतो.
8. बाबरी मशीद वाद- बाबरी मशीद पाडली गेली तेव्हाचे फूटेज सिनेमात दाखवले गेले आहे. याप्रसंगी सिनेमात दाखवलं गेलं आहे की लाल सिंग चड्डाला पुन्हा घरातून ताकिद मिळते की घराबाहेर त्याने अशा धोक्याच्या प्रसंगी बाहेर पडू नये.
9. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट- यावेळी पुन्हा लाल सिंगला आईकडून घरातून बाहेर पडू नये अशी ताकिद मिळते.
10. कारगिल युद्ध- लाल सिंग यावेळी सैन्यात रुजु झालेला दाखवला गेला आहे. तो सिनेमात कारगिल युद्धात लढण्यासाठी गेलेल्या पहिल्या तुकडीचा भाग असतो.
11. मुंबईवर २६ जुलै रोजी झालेला दहशतवादी हल्ला- चहुबाजूंनी आगीनं वेढलेलं ताज हॉटेल सिनेमात दाखवलं गेलं आहे, आणि एका प्रसंगी संपूर्ण स्क्रीनवर अजमल कसाबचा फोटो दिसतो.
सिनेमात टप्प्या टप्प्यावर फिल्मी गाणी ऐकायला मिळतात. अगदी तुम बिन सिनेमातलं 'थोडा दारू विच प्यार मिला दे' या गाण्यापासून ते 'रंग दे बसंती' ,'इक ओंकार' या गाण्यापर्यंत खूप गाणी ऐकायला मिळतात. याचबरोबर शाहरुख खानच्या सिनेमातीलही गाणी पहायला मिळतात. आणि हेच शाहरुखचं वेगळं मजेदार कनेक्शन या सिनेमाशी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.