'आमचं कुटुंब रस्त्यावर आलं होतं'; आर्थिक संकटांबाबत आमिर व्यक्त

..म्हणून आमिरने कधीच निर्माता न होण्याचा निर्णय केला होता.
Don’t have any interest in going to Hollywood: Aamir Khan
Don’t have any interest in going to Hollywood: Aamir Khan
Updated on

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने Aamir Khan अनेकदा निर्माता न होण्याचा विचार केला होता. मात्र 'लगान' Lagaan चित्रपटासाठी त्याला निर्माता व्हावं लागलं होतं. जगभरातून कौतुकाचा वर्षाव झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. वडील ताहिर हुसैन यांना ज्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता, ते पाहून आमिरने निर्माता न होण्याचा निर्णय घेतला होता. (Aamir Khan recalls fathers financial debt says family was almost on the roads)

माध्यमांशी बोलताना आमिर म्हणाला, 'माझ्या कुटुंबातील अनेकजण इंडस्ट्रीत काम करणारे होते. माझे काका चित्रपट बनवायचे, माझे बाबा चित्रपटसृष्टीत काम करायचे. माझे बाबा खूप उत्साही निर्माते होते. पण व्यवसाय कसा करायचा हे त्यांना माहित नव्हतं. त्यामुळे त्यांच्या हाती कधी पैसा आलाच नाही. एखाद्या चित्रपटाला कधी आठ वर्षे लागायची तर कधी तीन वर्षे. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.'

Don’t have any interest in going to Hollywood: Aamir Khan
'ही' मालिका ठरली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

वडिलांच्या कर्जबाराजीपणावर आमिर या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. 'त्यांच्यावर खूप मोठं कर्जाचं ओझं होतं आणि असंख्य आर्थिक अडचणींतून जाताना त्यांना मी पाहिलंय. त्यांच्याकडे पैसेच उरले नव्हते आणि आम्ही सर्वजण रस्त्यावर आलो होतो. त्यावेळी मी लहान होतो. पैसे परत मागण्यासाठी अनेकांचे दिवसभरात फोन यायचे. एका मध्यरात्री बाबा उठून त्यांची पदवीची कागदपत्रं शोधत बसायचे. नोकरी करावी लागेल, या विचाराने अस्वस्थ व्हायचे. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांना पदवीची कागदपत्रं शोधावी लागत होती. ही सर्व परिस्थिती पाहून मला कधीच निर्माता व्हायचं नव्हतं,' असं आमिर म्हणाला.

'लगान' चित्रपटाची निर्मिती करायला कोणीच तयार नव्हतं, म्हणून अखेर आमिरलाच त्याची निर्मिती करावी लागली. फक्त एकाच चित्रपटापुरतं निर्मितीचं काम करू, असा विचार त्यावेळी आमिरने केला होता.

Don’t have any interest in going to Hollywood: Aamir Khan
ओमची उडवली जातेय खिल्ली; मालिकेची सोशल मीडियावर चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()