आमिर खानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आमिरला देशभरातील लोक मोठ्या संख्येने पसंत करतात. आमिरला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. शालेय जीवनातही आमिर मुलींमध्ये खूप लोकप्रिय असायचा. आमिर खान जेव्हा रजत शर्माच्या टॉक शो 'आप की अदालत'मध्ये पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले होते.
यावेळी अभिनेत्याने सांगितले होते की लहानपणी त्याची आई त्याला कृष्ण म्हणायची. इतकंच नाही तर यादरम्यान एका मुलीने आमिर खानचा प्रपोजल नाकारल्यानंतर त्याने मुंडन केल्याचेही समोर आले आहे.
यादरम्यान रजत शर्मा आमिर खानला विचारतात, "आम्ही तुझ्या जीवनावर संशोधन केले आणि आम्हाला तुझ्या बालपणातील काही गोष्टी कळल्या. तू पाचवीपर्यंत मुलींच्या शाळेत शिकत होतास?" या प्रश्नावर आमिर हसतो आणि उत्तर देतो, "तुमचे संशोधन बर्याच अंशी बरोबर आहे.
मी पाचवी नाही तर दुसऱ्या वर्गापर्यंत शिकलो. मला खूप मजा आली. मी तुम्हाला सांगतो, मी लहान असताना माझी आई मला कृष्णा म्हणायची. मला लोणी खूप आवडायचे, आणि दुसरे म्हणजे मी शाळेत असताना सतत मुलींसोबत असायचो".
यानंतर रजत शर्मा म्हणतात, "एका मुलीने तुला नाकारले तर तू तुझे मुंडण केले होते". ज्यावर आमिर म्हणतो, "अरे बाप रे! हे शाळेत असताना नाही झाले. तेव्हा मी खूप लहान होतो.
जेव्हा मी मुंडन केले त्यावेळी मी 17-18 वर्षांचा होतो, तेव्हा एका मुलीने माझे हृदय तोडले होते. आणि त्यावेळी मी इतका अस्वस्थ झालो होतो की मला काय करावे हेच कळत नव्हते. म्हणून मी जाऊन मुंडन केले." आमिरची ही गोष्ट ऐकून सगळे जोरजोरात हसू लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.