Aamir Khanचा 'लाल सिंग चड्ढा'(Lal Singh Chaddha) सिनेमागृहात प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तर तिकडे हृतिक रोशन-सैफच्या 'विक्रम वेधा'(Vikram Vedha) सिनेमाचं कामही पूर्ण होत आलं आहे. आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' नंतर बरोबर दीड महिन्यांनी हृतिक रोशनचा(Hrithik Roshan) 'विक्रम वेधा' रिलीज केला जाणार आहे. आमिर आणि हृतिक दोघंही मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. आमिर चार वर्षानंतर तर हृतिक त्याच्या 'वॉर' सिनेमानंतर तब्बल ३ वर्षांनी बॉक्सऑफिसवर परतोतय. या दोन्ही सिनेमांकडून बॉक्सऑफिसला मात्र खूप अपेक्षा आहेत. आता हे वेळच सांगेल,पण सध्या या दोन्ही सिनेमांचे एक मोठे कनेक्शन समोर आले आहे. (Aamir Khan’s film Lal Singh Chadha’s special connection to Hrithik Roshan’s)
प्रेक्षक जेव्हा 'लाल सिंग चड्ढा' पहायला सिनेमागृहात येणार तेव्हा आता त्यांना हृतिक रोशनचा सिनेमा 'विक्रम वेधा'चा ट्रेलर देखील पहायला मिळणार आहे. 'विक्रम वेधा'चा ट्रेलर-टिझर ९ किंवा १० ऑगस्टला मुंबई आणि साऊथमध्ये एकाच वेळेस रिलीज केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर ११ ऑगस्ट रोजी 'लाल सिंग चड्ढा' जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाच्या परफॉर्मन्सवर अर्थातच सगळ्यांच्या नजरा असणार. 'विक्रम वेधा'च्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' लोकांना सिनेमागृहाकडे आणण्यात यशस्वी ठरेल. त्यामुळे आपल्या 'विक्रम वेधाचा' ट्रेलर या सिनेमाच्या मध्ये दाखवणे फायद्याचे ठरेल असं त्यांना वाटत आहे. फ्रायडे फिल्म वर्क्स सोबत टीसिरीजने मिळून 'विक्रम वेधा' सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे.
'विक्रम वेधा' ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे. २ ऑक्टोबरला रविवार आहे. हृतिक रोशनसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिने लकी ठरलेले आहेत. याच महिन्यात त्याचे प्रदर्शित झालेले 'वॉर','बॅंग बॅंग','क्रिश ३', 'धूम २' या सिनेमांनी चांगला बिझनेस केला होता. 'विक्रम वेधा' २०१७ मध्ये याच नावानं प्रदर्शित झालेल्या तामिळ सिनेमाचा रीमेक आहे. ज्याला मूळ सिनेमाच्या पुष्कर-गायत्री या दिग्दर्शकांच्या जोडीनेच हिंदीतही दिग्दर्शित केलं आहे. हा सिनेमा विक्रम-वेतालच्या अॅक्शन थ्रिलर असलेल्या लोकप्रिय कथांपासून प्रेरित आहे. या सिनेमात हृतिक रोशन,सैफ अली खान व्यतिरिक्त राधिका आपटे, रोहित सराफ,योगिता बिहानी आणि शारिब हाश्मी यांच्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. मूळ तामिळ सिनेमात आर.माधवन आणि विजय सेतुपति यांच्या मु्ख्य भूमिका होत्या. हा सिनेमा तेव्हा बॉक्सऑफिसवर हिट ठरला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.