Aaradhya Bachchan : यूट्यूब टॅब्लॉइडविरोधात आराध्या बच्चन पोहोचली दिल्ली हायकोर्टात, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Aaradhya Bachchan moves Delhi HC against YouTube tabloid for fake reporting on her health
Aaradhya Bachchan moves Delhi HC against YouTube tabloid for fake reporting on her health
Updated on

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चन अनेकदा चर्चेत असते. आईसोबत बऱ्याच कार्यक्रमात ती दिसून आलेली आहे. तसेच आराध्याला बऱ्याचदा तिच्या लूकमुळे ट्रोल देखील केलं जातं. मात्र आराध्या सध्या एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आहे. आराध्याने एका यूट्यूब टॅब्लॉइडविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिने आपल्या आरोग्याबाबत खोट्या बातम्या दिल्याबद्दल यूट्यूब टॅब्लॉइडच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे.

11 वर्षांच्या आराध्याने, ती अल्पवयीन असल्याने, माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या अशा बातम्यांविरोधात मनाई आदेश देण्यात यावा अशी मागणी न्यायालयात केली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर 20 एप्रिलला काय सुनावणी होणार हे पाहावे लागणार आहे.

Aaradhya Bachchan moves Delhi HC against YouTube tabloid for fake reporting on her health
Same-Sex Marriage : 'सेम सेक्स मॅरेज' प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारचा दावा खोडला! केली महत्वाची टिप्पणी

आराध्या बच्चन ही नेहमीच मीडियामध्ये चर्चेचा विषय राहते. मात्र तिला तिच्या लूकसाठी ट्रोल केले जाते. यावरून संतापलेल्या अभिषेकने नेहमी त्याच्या मुलीला टार्गेट करणार्‍या ट्रोल्सवर टीका केली होती.

दरम्यान, आराध्या तिची आई ऐश्वर्यासोबत वारंवार सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. नुकतेच जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटनप्रसंगी दोघी एकत्र दिसल्या होत्या.

Aaradhya Bachchan moves Delhi HC against YouTube tabloid for fake reporting on her health
Maharashtra Bhushan : विलासरावांनी दिलेला महाराष्ट्र भूषण निळू फुलेंनी नम्रतापूर्वक नाकारला होता आणि…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.