मराठी कलाकार क्रांतीच्या पाठिशी नाहीत हे आश्चर्यकारक- आरोह वेलणकर

अभिनेता आरोह वेलणकरने ट्विट करत क्रांतीला पाठिंबा दर्शविला.
Aaroh velankar
Aaroh velankarInstagram/ Google
Updated on

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे चांगलेच चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. सोबतच सोशल मीडियावर आम्हाला ठरवून टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप क्रांतीने केला. या प्रकरणानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अद्यापही उघडपणे क्रांतीला पाठिंबा देत नाही, याबद्दल आश्चर्य वाटतं, असं अभिनेता आरोह वेलणकरने म्हटलंय. यासोबतच, मी क्रांतीचा खास मित्र नसलो तरी तिला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असं त्याने स्पष्ट केलं.

आरोहने एक ट्वीट केलं आहे. त्यात तो म्हणाला, “क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीतील अनेक मित्र तुला पाठींबा देण्यासाठी उघडपणे व्यक्त होत नाहीयेत. सोशल मीडियावरून सुरू असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर (PR) मोहीम खरंच अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे की आपण खूप चांगले मित्र नाही आहोत, पण तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.”

Aaroh velankar
"हा समाजच त्या लायकीचा नाही.."; वानखेडेंच्या पाठिशी उभा राहिला अभिनेता

पत्रकारांशी संवाद साधताना क्रांती म्हणाली, "समीर हे निर्दोष आहेत. मला आणि माझ्या कुटुंबीयांना या प्रकरणाचा खूप त्रास होत आहे. माझ्याच राज्यात मला जीवे मारण्याच्या, लटकवण्याच्या धमक्या येत आहेत. समीर यांची काम करण्याची पद्धत अनेकांना खटकणारी असल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते आहे. त्यांना पदावरून काढल्याने कोणाचा फायदा होईल हे मी वेगळं सांगायची गरज नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.