बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने Salman Khan त्याचा मेहुणा आयुष शर्माला Aayush Sharma बॉलिवूडमध्ये लाँच केलं. मात्र आयुषने काहीही केलं तरी ते सलमानमुळेच झालं, असा लोकांचा समज झाल्याचं तो म्हणतो. सलमानशिवाय माझं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि माझ्याकडेही पैसा आहे, अशी प्रतिक्रिया आयुषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. आयुषने सलमानची बहीण अर्पिता हिच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर आयुषने कोणतीही गोष्ट केली तरी त्याचा संबंध सलमानशी लावला जात असल्याची खंत त्याने व्यक्त केली.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत आयुष म्हणाला, "दुर्दैवाने माझ्या आयुष्यात असंच घडतं. मी एखादी छोटीशी गोष्ट जरी केली, समजा कार विकत घेतली, तर ओह सलमानकडून कार भेट म्हणून मिळाली, असा अंदाज लावला जातो. मी काहीही केलं तरी ते सलमानमुळे शक्य झालं असा लोकांचा समज आहे. माझ्याकडेसुद्धा पैसा नाही. मी असाच इथेतिथे फिरत नाही. आता मला अशा ट्रोलिंगची सवय झाली आहे. किंबहुना असे ट्रोल्स, नकारात्मकता मला आवडू लागली आहे. कारण अशा लोकांना मी चुकीचा ठरवू शकतो, अशी भावना माझ्या मनात असते. जेव्हा पहिल्यांदा माझ्यासोबत असं घडलं, तेव्हा मी फार दु:खी होतो. पण आता मला अशा टीकांची सवय झाली आहे."
गेल्या आठवड्यात आयुष शर्मा आणि सलमान खान यांचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा चित्रपट प्रदर्शित झाला. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. आयुषचा हा दुसरा चित्रपट आहे. त्याने 'लवयात्री' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'अंतिम'मध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑपिसवर २७.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या आठवड्यात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या 'तडप' या चित्रपटाची टक्कर 'अंतिम'सोबत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.