Irfan Khan: अब्बा बेडवर झोपले होते, त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि... शेवटच्या क्षणी इरफानची अवस्था

इरफानच्या शेवटच्या अवस्थेबद्दल त्यांचा मुलगा बाबीलने व्यक्त केलेली कहाणी हृदयस्पर्शी आहे.
 Irrfan Khan, irrfan khan, irrfan khan movies, irrfan khan family, irrfan, irrfan khan death anniversary
Irrfan Khan, irrfan khan, irrfan khan movies, irrfan khan family, irrfan, irrfan khan death anniversarySAKAL
Updated on

Irrfan Khan Death Anniversary: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी प्रसिद्धी आणि लोकप्रियेतचं शिखर गाठलं, पण लोकांच्या मनात आदर आणि प्रेमही तितकंच मिळवलं. अशा कलाकारांमध्ये इरफान खानचा नंबर सर्वात वरचा असेल.

इरफान आज आपल्यात नाही तरीही त्याच्या भूमिकांमधून तो अजरामर झालाय. दर्दी सिनेरसिकांना सध्याच्या काळात इरफानची तीव्रतेने आठवण आल्याशिवाय राहत नाही.

आज इरफानचा स्मृतिदिन. इरफानच्या शेवटच्या अवस्थेबद्दल त्यांचा मुलगा बाबीलने व्यक्त केलेली कहाणी हृदयस्पर्शी आहे.

(Abba was sleeping on the bed, he looked at me and... Irrfan khan state at the last moment say son babil khan)

इरफान खानचा मुलगा बाबिलने वडिलांसोबतचे शेवटचे क्षण आठवले आणि सांगितले की, “त्या दोन दिवसात मी हॉस्पिटलमध्ये होतो. बाबाचं भान हरपत चाललं होतं. त्याने फक्त माझ्याकडे पाहिले, तो हसला आणि म्हणाला, ‘मी आता मरणार आहे.’

आणि मी बाबाला म्हणालो, ‘नाही, तूला काही होणार नाही.’ मी असं म्हणताच इरफान पुन्हा हसला आणि तो झोपला.

पण मला खरंच वाटतं की त्याने पूर्णपणे शरणागती पत्करली होती. माझ्या मते अशा प्रकारची उत्क्रांती साध्य करण्यासाठी शब्द नाहीत.” इरफानचा मुलगा बाबीलने अलीकडेच कला या सिनेमात खूप सुंदर अभिनय केलाय.

 Irrfan Khan, irrfan khan, irrfan khan movies, irrfan khan family, irrfan, irrfan khan death anniversary
Adipurush: आदिपुरुष चा नवीन मोशन पोस्टर.. वाद झाल्यानंतर सीतेच्या भांगेत आली कुंकू - टिकली
 Irrfan Khan, irrfan khan, irrfan khan movies, irrfan khan family, irrfan, irrfan khan death anniversary
Dipika Chikhlia Birthday: या कारणामुळे दीपिका यांना सीता साकारण्यासाठी झालेला तीव्र विरोध, पण...

अशाप्रकारे इरफानने हसत हसत मृत्यूला स्वीकारलं. आपण हे जग सोडून जाणार याची त्याला कुठेतरी जाणीव होती. त्याची कल्पना इरफानची बायको आणि त्यांच्या मुलाला सुद्धा होती.

इरफान जेव्हा गेला तेव्हा कोरोना काळ सुरु होता. इरफानच्या अंत्यविधीला जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी सोडले तर बॉलिवूडमधून कोणीही सेलिब्रिटी आलं नव्हतं.

या गोष्टीचं इरफानचा खास मित्र आणि प्रसिद्ध अभिनेते - दिग्दर्शक तिगमांशू धुलियाला वाईट वाटलं होतं.

इरफान खानने पिकू, द लंचबॉक्स, पान सिंग तोमर आणि मदारी यासारख्या भारतीय सिनेमातील काही उत्कृष्ट कामे दिली.

इतकंच नव्हे तर लाईफ ऑफ पाय, ज्युरासिक पार्क, स्पायडरमॅन अशा हॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला.

इरफानच्या तिसऱ्या स्मृतीदिनाआधी दिग्दर्शक अनुप सिंग यांनी इरफानला श्रद्धांजली म्हणून दीर्घकाळ विलंब झालेला चित्रपट, द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.