Abdu Rozik: अब्दु रोजिक एमसी स्टॅनमध्ये या कारणामुळे झालाय राडा, छोट्या भाईजानने केला धक्कादायक खुलासा

बिग बॉस 16 ने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. बिग बॉस 16 चा फिनाले होऊनही बरेच दिवस झाले आहे. मात्र, असे असतानाही बिग बॉस 16 चे सदस्य चर्चेत आहेत.
abdu rozik and mc stan
abdu rozik and mc stanSakal
Updated on

'बिग बॉस 16' मध्ये 'मंडली'ने सर्वाधिक लक्ष वेधले. मंडलीमध्ये, अब्दु रोजिक, साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निम्रित कौर अहलुवालिया आणि सुंबूल तौकीर खान यांचा समावेश आहे. 'बिग बॉस'मध्ये त्यांच्यात घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती, पण शो संपल्यानंतर त्यांच्यात भांडणाच्या बातम्या येतच राहिल्या.

मंडली बिग बॉस 16 चा फिनाले झाल्यानंतर धमाल करताना दिसली. मंडलीला प्रेक्षकांनी देखील खूप जास्त प्रेम दिले. मात्र, नुकतेच अब्दू रोजिक याचे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असल्याचे कळत आहे. यावर अब्दू रोजिक याने भाष्य केले.

abdu rozik and mc stan
Salman Khan: अत्यंत साधेपणानं 1 BHK घरात राहतो भाईजान जवळच्या व्यक्तीनं केला खुलासा

लाईव्ह सेशनमध्ये अब्दू रोजिक हा एमसी स्टॅनबद्दल बोलताना दिसला. अब्दू म्हणाला की, एमसी स्टॅन याच्याबद्दल लोक मला सतत विचारत असतात. एमसी स्टॅनला जेव्हा मी कॉल करतो तेव्हा तो मला सलाम किंवा हाय वगैरे करत नाही. एमसी स्टॅन हा माझा फोन उचलत नाही.

अब्दू रोजिक पुढे म्हणाला, एमसी स्टॅनबद्दल मी कधी वाईट बोलू शकतो असे तुम्हाला खरोखर वाटते का? जेव्हाही तो बिग बॉसमध्ये दु:खी होता, तेव्हा मी त्याच्यासोबत होतो. मीडियामध्ये आता तो म्हणतोय की मी त्याला माझ्या गाण्याचे प्रमोशन करायला सांगत आहे. एमसी स्टॅन असे का करत आहे. माझे डोके दुखत आहे, मला त्या बातम्या पाहून राग येतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()