रत्नागिरीतील गायक अभिजीत नांदगावकरचं 'केव्हा केव्हा वाटते' हे पहिलं गीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. जगभरातील रसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी संगीत क्षेत्रातील नामांकित 'स्मृतिगंध' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हे गाणं प्रदर्शित होईल. या गीताचा गीतकार, संगीतकार आणि गायक अभिजीतच आहे. तब्बल २१ वर्षांपूर्वी हे गीत 'ताक धिना धिन' या तत्कालीन लोकप्रिय कार्यक्रमात निर्मात्या नीना राऊत (लोकमान्य, तान्हाजी या चित्रपटांचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या मातोश्री) यांनी आवर्जून समाविष्ट केले होते. गायक अभिजीत याने २१ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आता साकार होत आहे. इतक्या वर्षांनंतर अभिजीत नांदगावकर याने या गीताचे प्रोफेशनली रेकॉर्डिंग केले आहे.
या गीताबाबत अभिजीतने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "माझा पहिलावहिला व्हिडिओ अल्बम रसिकांच्या भेटीला येतोय, याची मला खूप उत्सुकता आहे. गाणं खूप सुंदर झाले आहे. आजच्या युवा पिढीसह सर्वांना हे गाणं आवडेल. विशेष बाब म्हणजे गीताचे व्हिडिओ मेकिंग दिवंगत प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या पुण्यातील अद्ययावत डॉन (Down) रेकॉर्डिंग स्टुडिओत झाले आहे. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे."
या गीताचे संगीत संयोजन समन्वयक म्हणून प्रसिद्ध संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी काम पाहिले आहे. तर प्रसिद्ध गायक केवल वाळंज याने गीताचे रेकॉर्डिंग, मिक्सिंग व मास्टरिंग केले आहे. सांताक्रूझ-मुंबई येथील डिएम स्टुडिओत या गीताचे रेकॉर्डिंग झाले आहे. तर पुण्यातील डी सेव्हन फिल्म्स अँड मीडियाचे संचालक तसेच दिग्दर्शक दिनेश पवार यांनी या गीताच्या व्हिडिओची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री पूनम घाडगेवर हे गाणं चित्रित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.