Abhijit Bichukle Tv Entertainment Big Boss fame : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या पोस्ट आणि वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. त्यानं यापूर्वी जी काही वक्तव्यं केली आहे त्यामुळे त्याला मिळालेली लोकप्रियताही मोठी आहे. कधी निवडणुकीच्या रिंगणात तर कधी थेटपणे बिग बॉसच्या सलमानला नडणारा बिचुकले आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.
अभिजित बिचुकलेनं थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं असून त्यात त्यानं केलेल्या मागणीचा गांभीर्यानं विचार व्हावा, असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शेवडी ते न्हावाशेवा सागरी सेतुच्या नामकरणाचा विषय सुरु आहे. त्याला सागरी सेतुला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जावे असा सत्ताधारी पक्षाचा विचार आहे.
अशावेळी बिचुकलेच्या त्या पत्रानं पुन्हा एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. येत्या १२ जानेवारीला शेवडी ते न्हावाशेवा या सागरी सेतूचे उद्घघाटन होणार असल्याची माहिती आहे. त्या सागरी सेतुला राष्ट्रमाता तथा राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव दयावे, कारण याच दिवशी राजमाता जिजाऊंची जयंती आहे या अनुषंगाने खऱ्या अर्थाने राजामातांचे या सागरी सेतूला नाव देऊन माँ साहेब जिजाऊंना आदरांजली दयावी. अशी मागणी बिचुकलेनं आपल्या पत्रातून केली आहे.
त्यानं त्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आजवर सरकारच्यावतीने अनेक तुमच्यापैकी नेत्यांचे अनेक उपक्रमांना नावे देऊन झाले. उदा. समृध्दी महामार्गाला सरकारने बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले. असे असताना आपण व आपले सरकार हे मतांपुरतेच आणि स्वार्थापुरतेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची नावं घेतात. ज्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले त्या महाराजांच्या नावावर तुम्ही फक्त राजकारणच केले.
१२ जानेवारी २०२४ ला जनतेच्या पैशातुन निर्माण झालेल्या सागरी सेतूचे उद्घाटन आहे. असे मला समजल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून सरकारला लक्षवेधी सूचना करु इच्छितो की, खऱ्या अर्थाने सरकारचे डोळे उघडे असतील आणि सरकारला राजमाता जिजाऊंचे महत्व कळत असेल तर, १२ जानेवारी हा दिवस माँ साहेब जिजाऊंची जयंती असल्यामुळे आपण उद्घाटन करीत असलेल्या शेवडी न्हावाशेवा या सागरी सेतूला सरकारने "राजमाता माँ साहेब जिजाऊ सागरी सेतू" असे नाव द्यावे.
हे नामकरण करून राजमातांना खऱ्या अर्थानं सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेकडून आदरांजली दयावी. ही माझी विशेष सूचना सरकारने मान्य करावी. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम दाखवून द्यावे. अशा शब्दांत बिचुकलेनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.