नवरा असावा तर असा! ऍशच्या चाहत्याला अभिषेकचे भन्नाट उत्तर

अभिषेक-ऐश्वर्याचा हा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच!
abhishek bachchan and Aishwarya Rai Bachchan
abhishek bachchan and Aishwarya Rai Bachchanesakal
Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे Aishwarya Rai Bachchan अनेक चाहते आहेत. काही चाहते तिच्यासोबत फोटो काढतात तर काही जण आठवण म्हणून तिचा ऑटोग्राफ घेतात. ऐश्वर्याचे भारतातच नव्हे तर परदेशातदेखील अनेक चाहते आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकचा Abhishek Bachchan नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या एका चाहत्याने तिच्याकडे एक अजब इच्छा व्यक्त केली. पण अभिनषेकने त्या चाहत्याला त्याच्या कूल अंदाजात उत्तर दिले.(abhishek bachchan reply to aishwarya Rai Bachchan fan with marry me sign is viral)

ऐश्वर्या आणि अभिषेकचा 2010 मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या आणि अभिषक तेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेले होते. तेव्हा त्या फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अभिषेक आणि ऐश्वर्या फोटोसाठी पोज देऊन थांबले होते. तेवढ्यात ऐश्वर्याचे एका चाहत्याकडे लक्ष गेले. त्या चाहत्याने 'ऐश्वर्या, माझ्यासोबत लग्न करशील का?' अशी लिहिलेली पाटी हातात धरली होती. ती त्याला पाहून हसली आणि 'हाय' असा इशारा केला. त्यानंतर अभिषेक त्या चाहत्याकडे पाहून म्हणाला, 'तिचे लग्न आधीच माझ्यासोबत झाले आहे.'

abhishek bachchan and Aishwarya Rai Bachchan
मलायकाचं पहिलं लग्न आणि मुलाबाबत व्यक्त झाला अर्जुन कपूर; म्हणाला..

या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी व्हिडीओमधील अभिषेक आणि ऐश्वर्याच्या जोडीचे कौतुक केले. अभिषेक आणि ऐश्वर्याचे 20 एप्रिल 2007 रोजी लग्न झाले. दोघांना 2011 मध्ये आराध्या नावाची मुलगी झाली. अभिषेक आणि ऐश्वर्याने गुरू, धुम-२, उमराव जान या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()