''सुशांत सिंग राजपुतमुळे मला खिशातले पैसे मोजावे लागले होते''

'केदारनाथ' सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने बोलून दाखवली मनातली सल....
Abhishek Kapoor,Sushant singh Rajput
Abhishek Kapoor,Sushant singh RajputGoogle
Updated on

आज सुशांत सिंग राजपूत(Sushant SIngh Rajput)आपल्यात नाही पण त्याने त्याच्या छोट्या फिल्मी कारकिर्दीत केलेल्या सिनेमांमुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उल्लेखनीय अभिनयामुळे त्याची दखलं घेणं अनेकदा भाग पडतं. 'काय पो छे' सिनेमातनं २०१३ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सुशातनं पुढे 'एम.एस.धोनी','शुद्ध देसी रोमान्स','छिछोरे','डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी','राबता','सोनचिडियॉं','केदारनाथ','दिल बेचारा' असे अनेक सिनेमे केले. यातील सगळेच सिनेमे बॉक्सऑफिसवर चालले अशातला भाग नाही पण सुशांतने अभिनयाच्या माध्यमातनं दाखवलेली चुणूक त्याचं बॉलीवूडमध्ये स्थान पक्कं करून गेली. पण असं असूनही बॉलीवूडमध्ये त्याचं स्ट्रगल करणं सपलं नव्हतं हे त्याच्या मृत्यूनंतर जो 'नेपोटिझम'चा मुद्दा उचलला गेला यावरून स्पष्ट होतं. आता यात किती गोष्टी ख-या आणि किती खोट्या यावर अजूनही वाद सुरूच आहेत. इथे हे सगळं सांगण्याचं कारण की केदारनाथ दिग्दर्शकांन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केदारनाथ सिनेमाशी आणि सुशांतशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींना पुन्हा चर्चेत आणलंय.

Sushant Singh Rajput, Sara Ali Khan
Sushant Singh Rajput, Sara Ali KhanGoogle

अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' या सिनेमात सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान ही जोडी आपल्याला पहिल्यांदा एकत्र पडद्यावर पहायला मिळाली. २०१८ मध्ये या सिनेमाच्या माध्यमातनं सारा अली खाननं बॉलीवूडमध्ये मोठ्या दणक्यात पदार्पण केलं. सिनेमातली हिंदू धर्मीय मुक्कू आणि मुस्लिम धर्मीय मन्सूरची लव्ह स्टोरी भाव खाऊन गेली. सुशांत-साराचा सिनेमातील सहज अभिनय आणि जमून आलेली उत्तम केमिस्ट्री सिनेमाला यश मिळवून देण्यात फायदेशीर ठरली. पण हा सिनेमा जितका सहज बनला असं वाटत असलं तरी हा सिनेमा करताना खूप त्रासदायक गोष्टींचा सामना करावा लागला होता. आणि याचं मुख्य कारण होतं सुशांत सिंग राजपूत. असं अभिषेक कपूर का म्हणाला असेल?

Abhishek Kapoor,Sushant singh Rajput
प्रियंकासोबत लग्न करताना निक जोनसला 'या' गोष्टीची वाटत होती भीती

अभिषेक एका मुलाखतीत म्हणाला,''केदारनाथ सिनेमाच्या निर्मितीत ज्यांनी पैसा लावला होता. त्यांनी अचानक सुशांत स्टार नाही हे कारण सांगून सिनेमातनं पैसा काढून घेतला. सुशांतही तेव्हा चांगल्या मन:स्थितीत नव्हता. आणि याचाच फायदा घेऊन त्याच्याविषयी इंडस्ट्रीत काहीबाही पसरवलं जात होतं. आणि हेच निमित्त ठरलं केदारनाथ मधनं फायनान्सर्सनी पैसे काढून घेतले. पण तेव्हा मी हार मानली नाही. 'केदारनाथ' माझ्यासोबत सुशांतच्याही जवळचा प्रोजेक्ट बनला होता. मी माझ्या खिशातले पैसे लावून सिनेमा पूर्ण केला. सिनेमा नाही चालला तर माझे काय होईल असा विचार मी तेव्हा केला नाही. माझ्यासाठी ती कलाकृती पूर्ण होणं महत्त्वाचं होतं''.

Abhishek Kapoor,Sushant singh Rajput
सध्यातरी माझ्याकडे 'रणबीर' विषयावर तुमच्यासाठी चांगलं उत्तर नाही...

''मला आश्चर्य वाटतं,आज जेव्हा सुशांतच्या मृत्यूनंतर लोकं तो स्टार होता,उत्तम अभिनेता होता याचा डंका पिटत आहेत,ते जर तो जिवंत असताना घडलं असतं,त्याच्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज सुशांत आपल्यासोबत असता. सुशांत तेव्हाही स्टार होता आणि आज,पुढे अनेक वर्ष त्याने केलेल्या सिनेमांंमुळे तो स्टार म्हणूनच ओळखला जाईल'',असंही अभिषेक कपूरनं नमूद केलं. १४जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतनं बांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती,ज्यामध्ये त्याचं निधन झालं होतं. 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरला लाखो-करोडो व्ह्यूज मिळून एक विक्रम झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.