Acid Attack Survivor to Shah Rukh Khan News: शाहरुख खान हा लाखो दिलाची धडकन. शाहरुख खानवर जगभरातले फॅन्स जीव ओवाळुन टाकतात. शाहरुख सुद्धा सोशल मिडीयावर फॅन्सवर प्रत्यक्ष संवाद साधत तर कधी त्यांना भेटून सरप्राईज देत असतो.
पण नुकतीच एका अॅसीड हल्ला पीडीतीने शाहरुखकडे मदतीची हाक मागीतलीय. प्रज्ञा प्रसुन सिंग या अॅसीड हल्ला पीडीतीने ट्विटरवर ट्विट करत शाहरुखकडे मदतीची हाक मागीतलीय. काय झालंय नेमकं आम्ही तुम्हाला सांगतो.
(Acid Attack Survivor Reaches Out To Shah Rukh Khan For Help After Denied Bank Account)
प्रज्ञा प्रसून यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "बँक खाते उघडणे हा माझाही अधिकार आहे." तिने तिच्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, "KYC प्रक्रियेसाठी मी डोळे ब्लिंक करू शकत नाही म्हणून मला बँक खाते नाकारण्यात आले हे अन्यायकारक आहे.
@iamsrk @MeerFoundation ला विनंती करत आहे की या जगात सर्व अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी जीवन जगणं सुखद व्हावं." तिने तिच्या ट्विटमध्ये 'I will not blink' हा हॅशटॅग जोडला आहे.
शाहरुख आणि त्याचे मीर फाऊंडेशन, शाहरुखचे दिवंगत वडील मीर ताज मोहम्मद खान यांच्या नावावर आधारित ,आहे.
ही एक सामाजिक संस्था असुन, या माध्यमातुन अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांचे पुनर्वसन केले जाते. या संस्थेच्या माध्यमातुन सुधारात्मक शस्त्रक्रियांसाठी निधी दिला जातो.
शाहरुखला टॅग करत प्रज्ञा यांनी ट्विट केले की, "अॅसिड हल्ल्यातून वाचलेली व्यक्ती असल्याने मला जगण्यास मनाई करू नये. सन्मानाने जीवन जगता यावे." आता शाहरुखच्या संस्थेच्या माध्यमातुन या पीडीतेला न्याय आणि मदत केली जाणार का हे पहायचं आहे.
शाहरुखच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, शाहरुखने त्याच्या पठाण सिनेमाच्या माध्यमातुन 2023 ची सुरुवात धमाकेदार केली. आता शाहरुख जवानच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जवान हा सिनेमा रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती असून त्याचे दिग्दर्शन अॅटली, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्माते आहे.
हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.