Bholaa Vs Dasara: तिसऱ्या दिवशीही 'भोला' ची जादू चालेना... जाणून घ्या साऊथच्या दसरा'ची अवस्था काय?

पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत अजय देवगणच्या भोलाने तिसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे.
Bholaa Vs Dasara
Bholaa Vs DasaraSakal
Updated on

सध्या चित्रपटगृहांमध्ये दोन मोठ्या चित्रपटांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. पहिला चित्रपट अजय देवगणचा भोला आणि दुसरा साऊथ अभिनेता नानीचा दसरा. हे दोन्ही चित्रपट ३० मार्चला एकाच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. दुसरीकडे, सुरुवातीच्या दोन्ही दिवशी दसरा चित्रपटाने कमाईच्या बाबतीत भोलाचा पराभव केला.

अजय देवगणच्या भोलाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत 18.60 कोटी आणि दसरा चित्रपटाने 32.95 कोटी कमावले. त्याचवेळी शनिवार असल्याने तिसऱ्या दिवशी दोन्ही चित्रपटांच्या कमाईत मोठी झेप होईल, असे बोलले जात होते. चला तर मग जाणून घेऊया या दोन्ही चित्रपटांच्या तिसऱ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल.

Bholaa Vs Dasara
Kajol: काजोलचं पण ऐकेना मुलगी न्यासा... ती कृती पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी घेतली शाळा...

पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत भोलाचा दणदणाट तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.20 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 7.40 कोटींची कमाई केली असताना, तिसऱ्या दिवशी या आकड्यात वाढ झाली आहे. अहवालानुसार भोलाने तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 12 कोटींची कमाई केली आहे. मात्र अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर या संख्येत थोडा बदल होऊ शकतो.

Bholaa Vs Dasara
Shah Rukh Khan: अंबानींच्या कार्यक्रमात पठाणने वरुण-रणवीरसोबत केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल

दसरा चित्रपटाने पहिल्या दिवशी 23.2 कोटींची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी हा आकडा 9.75 कोटींवर आला होता. तिसऱ्या दिवशी नानीच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. अहवालात तिसऱ्या दिवसाची अंदाजे कमाई 13 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संख्या पहिल्या दिवसापेक्षा कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.