Raid 2: IRS अमय पटनायकला नवी टीप! आता कोणाच्या घरावर पडणार रेड? या तारखेला होणार 'रेड 2' रिलीज

अजय देवगणच्या आगामी रेड 2 सिनेमाची घोषणा झालीय
actor ajay devgn Raid 2 is all set for a theatrical release on 15th November 2024
actor ajay devgn Raid 2 is all set for a theatrical release on 15th November 2024 SAKAL
Updated on

Raid 2 Ajay Devgn News: २०१८ मध्ये अजय देवगणच्या ब्लॉकबस्टर रेड सिनेमाने अनपेक्षितरित्या बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला कमावला. अजय देवगणने सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय सौरभ शुक्ला सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत होते.

सिनेमातील रहस्यमयी कथानकाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. आता रेडच्या पुढच्या भागाची घोषणा झालीय. अजय देवगण पुन्हा एकदा IRS अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे.

actor ajay devgn Raid 2 is all set for a theatrical release on 15th November 2024
Prashant Damle: "३६५ दिवस राजकारण्यांचा अभिनय सुरुच...", नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरुन प्रशांत दामलेंची फटकेबाजी

IRS अमय पटनायक उर्फ अजय देवगणला एक नवीन टीप मिळाली! यावेळी कोणाच्या घरावर छापा टाकणार हे जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक असतील.

2018 च्या ब्लॉकबस्टर रेड च्या जबरदस्त यशानंतर, अजय देवगण दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि निर्माते भूषण कुमार, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार पुन्हा एकत्र आलेत.

रेड 2 साठी ही सर्व टीम एकत्र आली आहेत. यानिमित्ताने इन्कम टॅक्स विभागाच्या अनसन्ग हिरोंचा गौरव होणार आहे. रेड 2 पुन्हा एकदा सत्य घटनेवर आधारित एक गोष्ट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.

रेड 2 या चित्रपटाचे चित्रीकरण आजपासून मुंबईत सुरू झाले असून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्याचे चित्रीकरण होणार आहे.

पहिल्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. आणि आता रेड 2 च्या निमित्ताने दुहेरी ड्रामा आणि सस्पेन्ससहची गंमत प्रेक्षकांना बघायला मिळणार यात शंका नाही.

रेड 2 ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी त्यांच्या T-Series आणि Panorama Studios या बॅनरखाली होत आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.