मुंबई - देशात कोरोनाचा (corona) कहर सतत वाढतो आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रेटीही पुढे सरसावले आहेत. रुग्णालयांध्ये आवश्यक असणा-या वस्तूंचे वाटप यावेळी सेलिब्रेटींनी केले आहे. बॉलीवूडचा खिलाडी हा (bollywood khiladi) जसा त्याच्या अभिनयासाठी प्रसिध्द आहे तसा तो त्याच्या मदतशील स्वभावासाठीही प्रख्यात आहे. आता तो चर्चेत आला आहे त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यानं बॉलीवूडमधील तब्बल साडेतीन हजार ड़ान्सरला केलेली मदत. यामुळे अक्षय कुमारचे(actor akshay kumar ) कौतूक होताना दिसत आहे. (actor akshay kumar to help 3600 dancers of ganesh acharya foundation amid pandemic)
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अक्षय कुमार (actor akshay kumar ) पुढे सरसावला आहे. त्यानं यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली आहे. कोरोना झालेल्या लोकांसाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरची मोठी मदत त्यानं केली होती. तसेच क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या फाऊंडेशनसाठीही त्यानं मदत केली होती. त्याला १ कोटी रुपयांची मदत अक्षयनं केली होती. आता तो प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य फाऊंडेशनच्या (ganesh aacharya foundation) मदतीला धावला आहे.
त्याचे काय आहे की, गणेश आचार्य हा अक्षय कुमारच्या आगामी एका चित्रपटाची कोरिओग्राफी करत आहे. त्यावेळी गणेश यांनी अक्षयकडे त्याच्या बर्थ डे निमित्तानं गिफ्ट देण्याची मागणी केली होती. त्यानं अक्षयला त्याच्या 1600 ज्युनिअर कोरिओग्राफर आणि ज्येष्ठ डान्सर तसेच 2000 बॅकग्राऊंड डान्सर्ससाठी महिन्याचा किराणा देण्याची विनंती केली. अक्षयनं त्या विनंतीला मान दिला. आणि तो गणेशच्या मदतीला तयार झाला.
यानंतर अक्षयनं साडेतीन हजार डान्सरला किराणा वस्तुची मदत केली आहे. यापूर्वी अक्षयनं कोरोनाग्रस्तांची मदत केली आहे. त्यानं पीएम फंडासाठी 25 कोटी रुपयांचे य़ोगदान दिले होते. अक्षयच्या मदतीमुळे त्य़ाच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.