kedar shinde post: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे दर काही दिवसांनी या चित्रपटाविषयी लिहीत असतात, आठवणी शेयर करत असतात. एप्रिल 2023,मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटा संदर्भात आता अनेक नवीन घोषणा होत आहे. दर काही दिवसांनी या चित्रपतील महत्वाच्या भूमिका समोर येत आहेत. अशातच साने गुरुजींची भूमिका कोण साकारणार याबाबत केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेयर केली आहे.
(actor amit dolawat play sane guruji role in Maharashtra Shahir movie kedar shinde shared post )
या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच शाहीर साबळे यांच्या पत्नीची आणि आजीची भूमिका कोण करणार हे जाहीर केले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ही देखील या चित्रपटातून समोर येणार आहेत. अभिनेता अतुल काळे ही यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेत असतील. तर आता महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असे साने गुरुजी यांच्या भूमिकेट कोण असणार हे उघड झाले आहे. हि भूमिका अभिनेता अमित डोलावत करणार आहे.
साने गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त केदार शिंदेंनी ही पोस्ट शेअर केली. यावेळी त्यांनी म्हंटलंय की,"जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला तर तो आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांचे गुरू साने गुरुजी. वेळोवेळी शाहिरांच्या जीवनात येऊन त्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे कारण असलेले साने गुरुजी यांचा आज जन्मदिवस. त्याच प्रित्यर्थ तुमच्या समोर सादक करतो आहोत 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील साने गुरुजी यांची पहिली झलक. साने गुरुजींच्या भूमिकेत अमित डोलावत. गुरू शिष्याचं नातं उलगडणार... 28 एप्रिल 2023 रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात".
अमितने याआधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. स्टार प्रवाह वरील 'लक्ष्य' या कार्यक्रमातून त्याला खरी ओळख मिळाली. आता तो साने गुरूजींच्या भूमिकेत येत असल्याने त्याने मोठे आव्हान पेलले आहे. पण त्याचा पहिला लुक हा चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.