Anil Gavas : अभिनेते अनिल गवस यांना मिळाला आवाज परत; स्‍वर यंत्रणेवर यशस्‍वी शल्यचिकित्सा

हल्लीच्या जीवनात नावाबरोबरच तुमच्या आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणगी दिली आहे.
Anil Gavas
Anil GavasSakal
Updated on

मुंबई - हल्लीच्या जीवनात नावाबरोबरच तुमच्या आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणगी दिली आहे. त्यात जर ती व्यक्ती अभिनेता असेल तर त्यांचा आवाज ही त्यांची एक ओळख बनून जाते; मात्र काही कारणामुळे स्वरयंत्र म्हणजेच वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर व्होकल कॉर्डला काही दुखापत झाली तर ती व्यक्ती एका वेगळ्याच तणावाखाली जाते.

मराठी रंगभूमी, चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडणारे ज्‍येष्ठ रंगकर्मी अनिल गवस यांच्या घशावर नुकतीच बोरिवलीतील अॅपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात स्वर व्हॉईस अँड स्वालोविंग क्लिनिकमध्ये यशस्वी शल्यचिकित्सा करण्यात आली.

याविषयी अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ईएनटी आणि व्हॉईस सर्जन- लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बिन्ही देसाई सांगतात, अभिनेते अनिल गवस यांना  अचानक आवाजांमध्ये घोगरेपणा तसेच डबल आवाज जाणवू लागला होता. बोलताना त्यांचा घसा दुखू लागला होता, आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू केले.

अभिनेते अनिल गवस यांच्यावर स्ट्रोबोस्कोपी केली, जी आवाजाच्या समस्यांसाठी सुवर्ण मानक चाचणी आहे. या चाचणीमध्ये असे आढळून आले, की त्यांच्या उजव्या व्होकल फोल्डमध्ये मांस वाढले होते, त्यामुळे व्हॉईस बॉक्स पूर्णपणे भरला होता, तसेच जास्त रक्तपुरवठा झाल्यामुळे तो लाल झाला होता, ते लाल मांस एवढे वाढलेले होते, की त्यामुळे उजव्या व्होकल फोल्डच्या हालचालीवर परिणाम होत होता.

ताबडतोब शल्यचिकित्सा करण्याचा निर्णय घेतला व या गाठीचे मायक्रोलॅरिंजियल सर्जिकल एक्सिझन म्हणजे पूर्णपणे काढून टाकून शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. अनिल गवस यांच्या स्‍वरयंत्रणेत वाढलेले मांस (गाठ) १ सेंमी आकाराचे होते. या प्रक्रियेनंतर हळूहळू अभिनेते अनिल गवस यांचा मूळ आवाज परत आला असून आता ते नियमित डबिंग व शूटिंगमध्ये व्यग्र झाले आहेत.

स्वरयंत्रावर येतो ताण

मिमिक्री, सततच्या गायन-भजनांमुळे स्वरयंत्रावर ताण येतो, तसेच प्रदूषित हवेमुळे, दूषित पाण्यामुळेसुद्धा स्वरयंत्र खराब होऊ शकते. अनेक वेळा सर्दी-पडशामुळे स्वरयंत्राला सूज येते, आवाजात घोगरेपणा येतो व अशा स्थितीत त्यावर आपण उपचार केले नाहीत, तर स्वरयंत्र म्हणजेच वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर व्होकल कॉर्डला न भरून निघणारी हानी होऊ शकते, असा आरोग्यमंत्र नाक कान घसा तज्ज्ञ आणि व्हॉईस सर्जन लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बिन्ही देसाई यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.