Ayodhya Ram Mandir Inaguration: "विरोधी पक्षांच्या नशीबात...", अयोध्येत गेलेल्या अनुपम खेर यांचं मोठं विधान

अनुपम खेर यांनी अयोध्येत गेल्यावर विरोधी पक्षांवर टिका केलीय
actor anupam kher slams opposite party who not coming ayodhya ram mandir inaguration
actor anupam kher slams opposite party who not coming ayodhya ram mandir inaguration SAKAL
Updated on

Ayodhya Ram Mandir Inaguration: 500 वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर स्थापनेची वाट पाहणाऱ्या तमाम रामभक्तांसाठी आज आनंदाची बातमी आहे. आज अयोध्येत राम मंदिर स्थापनेचा सोहळा रंगणार आहे.

यानिमित्ताने सिनेजगतातील सेलिब्रिटी अयोध्येत दाखल झाले आहेत. अनुपम खेर हे त्यापैकीच एक. अनुपम यांनी हनुमान गढी मंदिरात पोहोचून तेथे दर्शन घेतले. याशिवाय त्यांनी विरोधी पक्षांना चांगलाच टोमणा मारला

actor anupam kher slams opposite party who not coming ayodhya ram mandir inaguration
Swaragandharva Sudhir Phadke Teaser: "आणि डोळे पाणावले..." सर्वात मोठ्या म्यूझिकल बायोपीकचा टिझर बघाच

अनुपम खेर सकाळीच हनुमान गढी मंदिरात पोहोचले. जिथे त्यांनी हात जोडून प्रार्थना केली आणि देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिर परिसरात जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. अनुपण यांनी न्यूज 18 शी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी या भव्य कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल विरोधी पक्षांवर टीका केली.

हनुमान गढी मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांनी न्यूज 18 शी संवाद साधला. ते म्हणाले, "हा क्षण डोळ्यांसमोर पाहण्याची संधी मिळणार हे आपले भाग्यच आहे. 500 वर्षांनंतर मिळालेली संधी बहुधा विरोधी नेत्यांच्या नशिबात नाही. त्यामुळेच या भव्य सोहळ्याला ते उपस्थित राहिले नाहीत." अशा शब्दात अनुपम खेर यांनी विरोधी पक्ष उपस्थित राहिले नाहीत म्हणून टिका केलीय.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या अभिषेकाची प्रक्रिया आज दुपारी 12.20 वाजता सुरू होईल. अभिजीत मुहूर्त आणि मृगाशिरा नक्षत्राच्या शुभ संयोगात राम लल्लाच्या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा होईल. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण पाच लोक गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.