Anushka Sharma
Anushka SharmaSakal

Anushka Sharma: अनुष्का शर्माची हायकोर्टात धाव...जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने टॅक्स विभागाच्या नोटीसला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रीकर विभागाच्या नोटीसला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 2012-13 आणि 2013-14 मध्ये सेल टॅक्स विभागाने अभिनेत्रीला नोटीस बजावली होती. आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्काने तिच्या टॅक्स कन्सल्टंटच्या मदतीने गेल्या महिन्यात 2 याचिका दाखल केल्या होत्या.

अनुष्काने विक्रीकर विभागाने दिलेले आदेश रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये विक्रीकर विभागाच्या आदेशाला आव्हान देणारी कर सल्लागार श्रीकांत वेळेकर यांची याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर अभिनेत्रीने गेल्या आठवड्यात याचिका दाखल केली.

Anushka Sharma
Adnan Sami:आंध्र प्रदेशच्या सीएमनी केलं गोल्डन ग्लोब मिळालेल्या RRR चं कौतूक..पण अदनान सामी भलताच उखडला

या प्रकरणाबाबत ट्विट करताना एएनआयने लिहिले की, “मुंबई उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. सेल टॅक्स विभागाच्या कारवाईला त्यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. यासोबतच अभिनेत्रीच्या याचिकेबाबत न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस पाठवली आहे. त्यानंतर 6 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यासोबतच उच्च न्यायालयाने विक्रीकर विभागाला या याचिकेवर 3 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

याआधी, काही वृत्तानुसार, न्यायालयाने अनुष्का शर्माला मागील सुनावणीत फटकारले होते. तसेच, कोर्टाने म्हटले होते की कर सल्लागाराद्वारे याचिका दाखल करण्याचे प्रकरण त्यांनी कधीही ऐकले नाही किंवा पाहिले नाही. कोर्टाने अनुष्का शर्माच्या वकिलाला विचारले की अभिनेत्री स्वतः ही याचिका का दाखल करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.