कर्म! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या.. आरोह वेलणकरचा शरद पवारांवर घणाघात..

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आरोह वेलणकरने थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
actor aroh welankar shared post about sharad pawar
actor aroh welankar shared post about sharad pawar sakal
Updated on

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री (Uddhav Thackeray Resigns) मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. फेसबूक लाईव्ह वरुण त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. लवकरच भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी बसतील अशी स्थिती असताना मनोरंजन विश्वातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (actor aroh welankar shared post about sharad pawar and vasant dada patil)

actor aroh welankar shared post about sharad pawar
विरोधी पक्ष नेत्यांपेक्षाही 'या' कलाकारांनी ठाकरे सरकारला आणलं होतं अडचणीत

महाविकास सरकार कोसळताच अभिनेता आरोह वेलणकर याने ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 'महाराष्ट्राची जनता जिंकली' असं ट्वीट आरोहनं केलं. या ट्विटला काही तास उलटलेले असतानाच त्याने पुन्हा एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने एका जुन्या वृत्तपत्राचा दाखला देत थेट शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

'कर्म!! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…' असं ट्विट आरोहने केलं आहे. सोबत एका वृत्तपत्राची प्रत जोडली आहे. ज्यामध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार कशा पद्धतीने पाडले होते हे दाखवण्यात आले आहे. तसेच शरब पवारांनी जो बंड इतिहासात केला तोच त्यांच्या नशिबात आला आहे. असा याचा अर्थ आहे. हे ट्विट सध्या बरेच चर्चेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()