Dhanush: 'बेटा हो तो ऐसा', धनुषने आई-वडिलांसाठी खरेदी केले 150 कोटींचे आलिशान घर

साऊथचा मोठा स्टार धनुषने पुन्हा एकदा त्याच्या आई-वडिलांसाठी आलिशान बंगला खरेदी केला आहे.
Dhanush
Dhanush Sakal
Updated on

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता धनुषने चेन्नईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले असून ते त्याच्या पालकांना भेट म्हणून दिले आहे. धनुषच्या फॅन क्लबचे अध्यक्ष आणि संचालक सुब्रमण्यम शिवा यांनी फेसबुकवर घराचे फोटो शेअर केली आहेत आणि धनुषचे कुटुंब नुकतेच या घरात राहायला आले असल्याचे सांगितले आहे.

चेन्नईच्या पोइस गार्डनमधील या आलिशान घराची किंमत सुमारे 150 कोटी रुपये असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

सुब्रमण्यम शिवा यांनी शेअर केलेल्या घराच्या फोटोंमध्ये धनुषचे वडील कस्तुरीराजा आणि आई विजयालक्ष्मी देखील दिसत आहेत. पोस्टमध्ये सुब्रमण्यम शिव यांनी लिहिले की, “माझा धाकटा भाऊ धनुषचे नवीन घर मला मंदिरासारखे वाटते. त्याने आपल्या आई-वडिलांना स्वर्गासारखे घर दिले आहे." पोस्टमध्ये सुब्रमण्यम शिवा यांनी धनुषचे कौतुक केले आहे.

Dhanush
Abdu Rozik: क्या बात है! शाहरुखचा 'पठाण' पाहण्यासाठी अब्दूनं पूर्ण थिएटरच केलं बुक, व्हिडिओ व्हायरल

नुकताच धनुषचा 'वाती' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून 20 कोटींची कमाई करण्यात यश आले आहे. या चित्रपटात धनुषसोबत मंयुक्ता मेनन दिसली आहे. वेंकी अटलुरी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 17 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

Dhanush
Dhanush Sakal
Dhanush
Dhanush Sakal

एका रिपोर्टनुसार, धनुषने 2012 मध्ये त्याच्या आई-वडिलांना एक घर गिफ्ट केले होते. त्यावेळी धनुषने जो बंगला खरेदी केला होता त्याची किंमत 5 कोटी रुपये होती. धनुषने सांगितले होते की, त्याच्या आई-वडिलांना एक आलिशान घर घेण्याची त्याची नेहमीच इच्छा होती. जे पूर्ण झाले आहे.

मात्र, तब्बल 13 वर्षांनंतर धनुषने पुन्हा एकदा त्याच्या आई-वडिलांसाठी 150 कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.