JD Majethia: 'खिचडी', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेचे निर्माते - अभिनेते जे. डी. मजेठिया यांंच्या वडिलांचं निधन

खिचडी फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन
actor JD Majethia Producer of 'Khichdi', 'Sarabhai Vs Sarabhai' father passed away
actor JD Majethia Producer of 'Khichdi', 'Sarabhai Vs Sarabhai' father passed away SAKAL
Updated on

JD Majethia News: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या आयकॉनिक आणि कल्ट क्लासिक शोच्या निर्मितीसाठी ओळखले जाणारे अभिनेते जेडी मजेठिया यांना पितृशोक झालाय. त्यांचे वडील नागरदासभाई मजेठिया यांचे आज निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला, त्यामुळे मजेठिया कुटुंब शोकसागरात बुडालंय.

टेली टॉक इंडियाच्या वृत्तानुसार, जेडी मजेठिया यांचे वडील नागरदासभाई मजेठिया हे गेल्या अनेक महिन्यांपासून वयाशी संबंधित आजारांने ग्रस्त होते. आज 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथील डहाणूकर वाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

actor JD Majethia Producer of 'Khichdi', 'Sarabhai Vs Sarabhai' father passed away
KRK Arrested: अभिनेता - समीक्षक कमाल आर. खानला मुंबईत अटक, सलमानवर केला गंभीर आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण

वडिलांच्या आकस्मिक निधनाने जे.डी. मजेठिया आणि परिवाराचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. आपल्या वडिलांसोबतचा आनंदी फोटो शेअर करताना जे.डी.मजेठिया लिहितात, “माझा सर्वात प्रिय माणूस, कायम असाच राहा. माझे सर्वात प्रिय व्यक्ती, माझे वडील नागरदास मजिठिया, 25/12/23 यांचं निधन झालं. आम्हा सर्वांना सोडून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले."

अभिनेते आणि निर्माते जेडी मजेठिया गुजराती मनोरंजन विश्वातील त्यांच्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदी नाटके, एकांकिका आणि चित्रपटांमध्ये केलेल्या कामांसाठी चांगली ओळखही मिळवली आहे. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' आणि 'खिचडी' हे दोन क्लासिक टेलिव्हिजन शो त्यांनी दिले आहेत.

अभिनेता म्हणून जेडी मजेठिया 'करिश्मा का करिश्मा', 'बा, बहू और बेबी' आणि इतर अनेक मालिकांमध्ये दिसले. विशेष म्हणजे जे.डी. मजेठिया गुजराती थिएटरमध्ये गेली २० वर्ष सक्रिय आहेत. त्यांनी अलीकडेच 'खिचडी 2: मिशन पांथुकिस्तान'मध्ये हिमांशू सेठची भूमिका केली.

शिवाय, त्यांनी खिचडी 2 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस 17 मध्ये इतर कलाकारांसह आपली उपस्थिती देखील दर्शविली. अनेक कलाकारांनी जे.डी.मडेठिया यांचं पितृछत्र हरपल्याबद्दल त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.