'सत्ता बळकावणाऱ्याला..' उद्धव ठाकरेंविषयी किरण मानेचं खळबळजनक विधान..

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर किरण माने व्यक्त झाले आहेत.
actor kiran mane shared post on CM uddhav thackeray speech on eknath shinde
actor kiran mane shared post on CM uddhav thackeray speech on eknath shinde sakal
Updated on

maharashtra politics : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. आता पर्यंत 40 आमदारांचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे. काही खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूणच राजकीय स्थिती पूर्णतः ढवळून निघाली आहे. एकनाथ शिंदे यांनी जणू स्वतःचा एक गट निर्माण केला आहे. या बंडामागे नेमकं काय कारण आहे याचा शोध अद्याप लागलेला नाही. परंतु सेनेला सत्ता सोडावी लागेल असे चित्र उभे केले जात आहे. त्यातच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री 'वर्षा' निवास रिकामे केले. जाताना त्यांनी समाज माध्यमांवरून जनतेशी भावुक संवाद साधला. यानंतर अभिनेता किरण माने (kiran mane) यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे मोठी खळबळ माजली आहे. (actor kiran mane shared post on CM uddhav thackeray speech on eknath shinde)

actor kiran mane shared post on CM uddhav thackeray speech on eknath shinde
Eknath Shinde : किरण मानेंनी सांगितलं बंडामागील 'मोठं कारण'

'मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन,' असे भावनिक भाषण काल उद्धव ठाकरे यांनी केले. यावर किरण माने यांनी एक टिपणी केली आहे. (kiran mane on uddhav thackeray speech)

किरण माने म्हणतात, 'अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्‍या, आक्रस्ताळेपणा करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्‍याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो”, असं किरण माने यांनी लिहिलं आहे. किरण माने एक कायमच विविध विषयावर लिहीत असतात. त्यांच्या राजकीय टिपण्या विशेष गाजल्या आहेत. किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून बाहेर काढल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आता त्यांनी थेट उघडपणे उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. (eknath shinde revolt)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.