Actor Manoj Joshi slams Air India for 'worst service
Actor Manoj Joshi slams Air India for 'worst serviceGoogle

Air India विरोधात अभिनेत्यानं उचललं मोठं पाऊल, मनोज जोशींच्या एअरपोर्टवरील व्हिडीओनं खळबळ

मिश्किल स्वभावाचे मनोज जोशी एअर इंडियावर खूप गंभीरपणे आरोप करताना पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.
Published on

Manoj Joshi slams Air India: प्रसिद्ध अभिनेता मनोज जोशी एरव्ही खूपच हसत-खेळत वावरताना दिसतात,तसा त्यांचा स्वभावच आहे म्हणा. पण सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यामध्ये ते खूपच रागात दिसत आहेत. मनोज जोशी यांनी व्हिडीओ आपल्या ट्वीटर हॅंडलवर पोस्ट केला आहे. ज्यात ते एअर इंडिया कंपनीच्या सेवेवर आपला राग व्यक्त करत आहेत. एअर इंडिया कंपनीची सेवा खूपच वाईट आहे आणि त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग कमी असल्यानं आपला संपूर्ण दिवस त्यात वाया गेल्याचं मनोज जोशी म्हणाले.(Actor Manoj Joshi slams Air India for 'worst service)

Actor Manoj Joshi slams Air India for 'worst service
Viral Video: करवा चौथच्या दिवशी राज कुंद्राची तोंड लपवण्यासाठी अजब हरकत; हसावं की रडावं काहीच कळंना..

मनोज जोशी यांनी हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टवर लगेज बेल्ट जवळ शूट केला आहे. जवळ-जवळ एक मिनिटाहून मोठा हा व्हिडीओ आहे. मनोज जोशी यात आपल्याला सांगताना दिसत आहेत की,ते गेल्या ४० ते ४५ मिनिटांपासून आपल्या सामानाची वाट पाहत लगेज बेल्टजवळ उभे आहेत,पण अद्याप त्यांचे सामान आलेले नाही. एवढंच नाही तर एअर इंडियाचा कोणी कर्मचारी वर्गही इथे दिसत नाही,ज्याच्याशी आपल्याला त्या संदर्भात संपर्क करता येईल. एकदम वरच्या पट्टीत भडकत मनोज जोशी म्हणालेत की एअर इंडिया कधी सुधारणार की नाही?

मनोज जोशी यांनी आपलं ट्वीट एअर इंडिया आणि छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टला टॅग केले आहे. त्यांनी लिहिलं आहे की,''एअर इंडियाच्या फ्लाइट नं ६३४ नं भोपाळहून तब्बल ३ तास उशिरानं उड्डाण केलं. आणि आता मुंबईला लगेज बेल्ट जवळ प्रवाशांना तब्बल ४० मिनिटं थांबवलं आहे,सामानाच्या प्रतिक्षेत. इथे कोणी त्यांचा कर्मचारी देखील नाही जो आम्हाला मार्गदर्शन करेल. मी इतकी वाईट सेवा कुठल्या विमान कंपनीची कधीच अनुभवली नाही. या लोकांनी माझा संपूर्ण दिवस वाया घालवला. माझं हे नुकसान कोण भरून देणार?'' मनोज जोशी यांच्या या व्हिडीओला तब्बल १ मिलियनहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.

मनोज जोशी यांच्या या ट्वीटवर एअर इंडियाच्या मॅनेजरनी आता रिप्लाय दिला आहे.

एअर इंडियाकडून उत्तरादाखल लिहिलं गेलं आहे की,''प्रिय मनोज जोशी, आम्हाला आशा आहे आपल्याला सामान मिळालं असेल. तुम्ही निश्चिंत व्हा,आपली तक्रार आम्ही आमच्या एअरपोर्ट टीमपर्यंत पोहचवू. आम्ही याची चौकशी करू. पुढील वेळेस आपल्याला चांगली सेवा मिळेल अशी आम्ही हमी देतो''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.