Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर खडकवासल्यातून निवडणूक लढवणार?

नाना पाटेकर खडकवासल्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे | actor Nana Patekar is likely to participate in Assembly Election from Khadakwasla...
actor Nana Patekar is likely to participate in Assembly Election from Khadakwasla Constituency
actor Nana Patekar is likely to participate in Assembly Election from Khadakwasla Constituency SAKAL
Updated on

Nana Patekar News: नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील आघाडीचे अभिनेते. नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी 'ओले आले' सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नानांबद्दल एक मोठी बातमी समोर येतेय.

नाना पाटेकर खडकवासल्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात नाना खडकवासल्यातून निवडणूक लढवताना दिसण्याची दाट शक्यता आहे.

actor Nana Patekar is likely to participate in Assembly Election from Khadakwasla Constituency
Tripti Dimri: 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर चमकलं 'भाभी 2'चं नशीब! कार्तिक आर्यनसोबत या बिग बजेट सिनेमात झळकणार

एका वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात बोलताना, नाना पाटेकर यांनी मोदींचं कौतुक केलं होतं.. मोदींच्या समोर सध्या कुणीच नसल्याचं त्यांनी विधान केलं होतं.

नाना पाटेकरांच्या विधानावरून कॉंग्रेसने त्यांच्यावर टिकाही केली.

याशिवाय यापूर्वी गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडेही नाना पाटेकर यांनी खडकवासल्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यामुळे सूत्रांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून नाना निवडणूक लढवतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

सिंहगडला नाना नाटेकरांचं फार्महाऊस आहे. याशिवाय शेतीसाठी बराच काळ नानांचा खडकवासल्यात मुक्काम असतो. त्यामुळे नाना पाटेकर खडकवासल्यातून विधानसभा लढवणार असं बोलण्यात येतंय. नानांनी याविषयी अधिकृत विधान दिलं नाही.

actor Nana Patekar is likely to participate in Assembly Election from Khadakwasla Constituency
Tripti Dimri: 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर चमकलं 'भाभी 2'चं नशीब! कार्तिक आर्यनसोबत या बिग बजेट सिनेमात झळकणार

२०२४ ची निवडणूक आणि मोदींबद्दल नाना काय म्हणाले?

झी बिझनेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नानांना आगामी काळातील निवडणूकांविषयी विचारण्यात आले. नाना तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष पुन्हा सत्तेवर असेल, कोण जिंकेल, या प्रश्नावर नानांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. (What Nana said about election and PM Modi?)

नाना म्हणाले, "मला वाटतं बीजेपी पुन्हा एक मोठा विजय संपादन करेल. २०२४ च्या निवडणूकीमध्ये त्यांची सरशी होईल."

बीजेपीला किती जागा मिळतील यावर नाना म्हणाले, "३७५ ते ४०० जागा बीजेपीला मिळतील. एक कारण म्हणजे आपल्याकडे बीजेपीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच दिसतील." असेही नानांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.