Pradip Mukherjee Death : अभिनेता प्रदीप मुखर्जी यांचे निधन

सत्यजित रे यांच्या 'जन अरण्य' चित्रपटामधील भूमिकेमुळे त्यांना ओळख मिळाली.
Pradip Mukherjee
Pradip Mukherjeeesakal
Updated on

Pradip Mukherjee Death News : मनोरंजन विश्वातून सोमवारी संध्याकाळी दुखद बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपट विश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता प्रदीप मुखर्जी (Pradip Mukherjee) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने आज पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकात्यातील एका दवाखान्यात शेवटचा श्वास घेतला. प्रदीप हे ७६ वर्षांचे असताना जगाचा निरोप घेतला आहे.

Pradip Mukherjee
वाह रे पठ्ठ्या! कार्तिकने ९ कोटींची पान मसाल्याची जाहिरात नाकारली

अभिनेत्याला सत्यजित रे यांच्या 'जन अरण्य' मधील भूमिकेमुळे ओळख मिळाली होती. या व्यतिरिक्त त्यांनी बाॅलीवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) आणि अभिनेता अर्जुन रामपाल यांचा चित्रपट 'कहानी २ : दुर्गा रानी सिंह'मध्ये डाॅ मैतीची महत्त्वाची भूमिका केली होती. चित्रपटातील आपल्या या भूमिकेसाठी प्रदीप मुखर्जी यांनी खूप वाह वाह मिळवली होती. प्रदीप मुखर्जी यांना २२ ऑगस्ट रोजी फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यानंतर दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. (Entertainment News)

Pradip Mukherjee
KKK 12 : 'खतरों के खिलाडी'मध्ये ट्विस्ट, वाईल्ड कार्डने स्पर्धक परतणार !

येथे त्यांची रविवारपासून तब्येत बिघडत चालली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अभिनेत्याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांत दोनदा ते कोरोनानेही संक्रमित झाले होते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४६ रोजी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.