eknath shinde : महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला आता पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्काच ठरला. कारण गेली काही दिवस शिंदे यांचे बंड, गुवाहाटी दौरा या सगळ्याने मोठी राजकीय उलथपालथ निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अगदी कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'धर्मवीर' चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका सकरणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) यानेही खास शुभेच्छा शिंदेंना दिल्या आहेत. (Prasad Oak shared Post for CM Eknath Shinde)
धर्मवीर आनंद दिघे यांच्या चरित्रावर आधारलेला 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा १३ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने महाराष्ट्रात आनंद दिघे नावाच्या वादळाची पुन्हा आठवण करून दिली. आनंद दिघे यांच्या सोबत एक व्यक्ती चित्रपटात महत्वाची ठरली ती म्हणजे एकनाथ शिंदे. असं म्हणतात हा चित्रपट आनंद दिघे यांचा होता तितकाच एकनाथ शिंदे यांचा होता. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली होती. त्यामुळे प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांचे विशेष नाते आहे. मुख्यमंत्री पद भूषवल्या नंतर प्रसादने एकनाथ शिंदे यांचे भरभरून कौतुक केले आहे.
प्रसादने एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब... मन: पूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा.' तर दिग्दर्शक विजू माने यांनी यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 'ठाणे जिल्ह्याचे पहिले मुख्यमंत्री... एकनाथजी शिंदे... लई अभिमान..' असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.