Ranveer Singh: "आई - वडिलांचे जुने फोटो आणि..." आयुष्यात अनोखी गोष्ट घडल्याने रणवीर भावूक, काय घडलं नेमकं?

रणवीरच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडलीय
actor Ranveer Singh unveils his wax statue at Madame Tussauds in London emotional post viral
actor Ranveer Singh unveils his wax statue at Madame Tussauds in London emotional post viral SAKAL
Updated on

Ranveer Singh News: अभिनेता रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. रणवीर सिंगने त्याच्या अभिनय कारकीर्दीत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. यावर्षी २०२३ मध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी केलीय.

अशातच रणवीर सिंगच्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट केलीय. लंडनच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये रणवीरच्या दोन मेणाच्या पुतळ्याचं अनावरण झालंय.

actor Ranveer Singh unveils his wax statue at Madame Tussauds in London emotional post viral
Salaar Trailer: "जब दो जिगरी दोस्त दुश्मन बने!" रक्तरंजित 'खानसार'ची कहाणी, 'सालार'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मादाम तुसाद म्युझियममधील फोटो शेअर करताना रणवीर म्हणतो, "मोठा होत असताना, जगातील काही प्रसिद्ध आणि प्रमुख व्यक्तींसोबत माझ्या आई-वडिलांचे जुने फोटो पाहून मला भुरळ पडली, पण ते फोटो लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसादमधील मेणाच्या आकृत्या आहेत हे मला नंतर लक्षात आलं.”

रणवीर पुढे म्हणाला, “लंडनच्या मादाम तुसाद या पौराणिक संग्रहालयाचे आकर्षण माझ्यासोबत कायम राहिले. आता तेथे माझी स्वतःची मेणाची आकृती असणे, यावर मला विश्वास बसत नाहीय. माझा पुतळा जगातील सर्वात कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांमध्ये उभा असल्याने मला कृतज्ञता वाटते. एक अविस्मरणीय क्षण. ज्या जादुई सिनेमॅटिक प्रवासाने मला या मुक्कामी पोहोचवले त्याचा माझ्या मनात विचार सुरु आहे."

अशाप्रकारे लंडनच्या मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये रणवीरचे एक नव्हे तर दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रणवीरला खुप आनंद झालाय.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... या वर्षी रणवीरने रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा त्याच्या अभिनयाने गाजवला. रणवीर आता आगामी 'सिंघम अगेन' सिनेमात झळकणार आहे. याशिवाय फरहान अख्तरच्या आगामी 'डॉन 3' मध्ये रणवीर झळकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.