Sharman Joshi: ४४ वर्षांचा शर्मन आहे अजूनही विशीतल्या तरुणाएवढा फिट! 'हा' डायट प्लॅन तुम्हालाही आवडेल..

डायट असला तरी शर्मन जोशी पक्का फुडी आहे.. हे पदार्थ खास आवडीचे..
actor sharman joshi diet healthy food likes sweet gym exercise lifestyle
actor sharman joshi diet healthy food likes sweet gym exercise lifestylesakal
Updated on

‘थ्री इडियट्स’, 'गोलमाल' यांसारख्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाराय अभिनेता म्हणजे शर्मन जोशी. आज तो बॉलीवुडमध्ये टिकून असला आणि स्वतःची वेगळी ओळख त्याने निर्माण केली असली तरी अजूनही त्याने नाटक करणं सोडलं नाही. नाटक आणि सिनेमा असे दोन्ही पद्धतीचे काम करणाऱ्या खूप कमी नटांपैकी तो एक आहे.

प्रचंड कमालीचा आणि सहज अभिनय यासाठी तो ओळखला जातो. त्याची विनोदी भूमिका जितकी हसवते तितकीच गंभीर भूमिका विचार करायला भाग पाडते. अशा शर्मन जोशीचा आज वाढदिवस. आज तो ४५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पण अजूनही वीस वर्षाच्या मुलाला लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे. तेव्हा आज जाणून घेऊया त्याचा डायट प्लॅन नेमका कसा आहे.

(actor sharman joshi diet healthy food likes sweet gym exercise lifestyle)

actor sharman joshi diet healthy food likes sweet gym exercise lifestyle
Ashvini Mahangade: हा फोटो पाहून.. अश्विनी महांगडेने शेअर केली शाहीर साबळेंसोबतची खास आठवण

शर्मनच्या डायटमध्ये शक्यतो सगळे भारतीय पद्धतीचे खाद्यपदार्थ असतात आणि त्याला तेच प्रचंड आवडतात. शर्मन दिवसाची सुरुवात व्हेजिटेबल ज्यूस पिऊन करतो. नाश्त्याला ओट्स, एग व्हाइट्स आणि कॉफी असा आहार घेतो.

दुपारच्या जेवणात ग्रील्ड चिकन किंवा फिश यांचा प्रामुख्याने समावेश असतो, तर संध्याकाळी शर्मन स्नॅक म्हणून उकडलेली कडधान्ये किंवा फळे खायला प्राधान्य देतो. रात्रीच्या जेवणात कार्ब्सऐवजी प्रोटिनयुक्त आहार घ्यायला त्याला आवडते.

समतोल आहाराबरोबर पुरेसा व्यायाम आवश्यक असल्याचे त्याचे मत आहे. वर्कआऊटपूर्वी प्रोटिन शेक पितो. शर्मनला ब्रोकोली आणि दोडके अजिबात आवडत नाहीत. ‘चीट डे’ला पिझ्झा, मंचुरियन, फ्राईड राईस, चिप्स खाणे त्याला पसंत आहे. याशिवाय ग्रिल्ड क्लब सँडविच त्याचे फेव्हरेट आहे.

याशिवाय चायनीज आणि थाई फूडचादेखील चाहता आहे. पंजाबी पद्धतीने बनवलेले खाद्यपदार्थ आणि बटर रोटी हे फूड कॉम्बिनेशन त्याला खूप भावते. शरीराच्या आवश्यकतेनुसार कार्ब्स आणि प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करायला तो प्राधान्य देतो.

शर्मनला दाल, भाजी आणि चपाती एवढे साधे जेवण जरी दिले तरी तो आवडीने खातो. त्याच्या मते, राजमा चावल ही खायला चविष्ट आणि बनवायला सोपी अशी डिश आहे. शर्मनला स्वयंपाकाची फारशी आवड नाही. ‘फक्त गॅसवर पाणी उकळण्याशिवाय मला काहीही जमत नाही,’ असे तो गंमतीने सांगतो.

आईने बनवलेल्या पदार्थांचा तो खूप मोठा चाहता आहे. आईच्या हातच्या पदार्थांची चव इतर पदार्थांना नसल्याचेही तो सांगतो. तिच्या हातची ‘दाल मखनी आणि पराठा’ ही डिश त्याला प्रचंड आवडते. ‘घुगरा’ आणि ‘मोहन थाळ’ या दोन गोडाच्या पदार्थांवर त्याचे विशेष प्रेम आहे. याशिवाय शेव आणि चकलीसुद्धा त्याला खूप आवडते.

शर्मनला गोडाचे पदार्थ खूप आवडतात. बंगाली स्वीट, खोबऱ्याची बर्फी, गुलाबजाम आणि शिरा या स्वीट डिशेस त्याच्या मोस्ट फेव्हरेट आहेत. लहानपणाच्या आठवणींना उजाळा देताना शर्मन सांगतो, की, ‘शाळेतून घरी आल्यावर त्याची आजी त्याला पुरणपोळी खाऊ घालायची आणि त्याच्यासाठी बटाट्याचे वेफर्स आणि शिरासुद्धा आवडीने बनवत असे.’ आजीने बनवलेल्या खाद्यपदार्थांची सर इतर कुठल्याही पदार्थाना येणार नाही असेही तो सांगतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()