रँचो, फरहान आणि राजु तिघेही होते 'टल्ली'

त्यापैकी काही सीनची चर्चा ही नेहमीच होत असते.
 3 Idiots
3 Idiots Team esakal
Updated on

मुंबई - बॉलीवू़डमध्ये असे काही चित्रपट आहेत जे सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत जाऊन बसले आहेत. राजु हिरानी (Raju Hirani) दिग्दर्शित 3 इडियट्स (3 idiots) हा सिनेमाही त्यापैकी एक म्हणावा लागेल. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटानं मोठ्या प्रमाणावर बिझनेस केला होता. बॉलीवूडमधील (Bollywood) सर्वोत्तम चित्रपटांमध्ये समावेश झालेल्या या चित्रपटातील काही सीन आजही प्रेक्षकांच्या पसंतीचे आहेत. त्यापैकी त्या तिघांचा दारु पिण्याचा जो सीन होता त्याची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा होत आहे. (actor sharman joshi reveals aamir khan suggested they get drunk for 3 idiots stairs scene)

रँचो, फरहान आणि राजु या तिघांची गोष्ट 3 इडियट्स मधून मांडण्यात आली आहे. आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे त्या चित्रपटातील प्रत्येक सीन प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. त्यापैकी काही सीनची चर्चा ही नेहमीच होत असते. ज्यावेळी रँचो. फरहान आणि राजु हे त्यांच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दारु पित असतानाचा सीन त्यावेळी चर्चेत आला होता.

त्या तीन कलाकारांनी सुंदर अभिनय करत तो सीन यादगार केला होता. ते आपल्या प्राचार्यांना (बोमन इराणीला ) (Boman irani) शिव्या देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्या सीनबद्दल शर्मननं असं सांगितलं होतं की, तो सीन क्रिएट करण्यासाठी आम्ही तिघेही दारु प्यायलो होतो. शर्मननं याबाबत टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, मला अजूनही तो प्रसंग लक्षात आहे ज्यावेळी मी, आमीर, मॅडी तो सीन करत होतो तेव्हा खरचं दारु प्यायलो होतो.

 3 Idiots
..म्हणून वडील मंत्री झाल्यानंतर सोनाक्षीने शाळा सोडण्याचा दिला इशारा
 3 Idiots
Photo : श्रेया घोषालने पोस्ट केला मुलाचा पहिला फोटो

आमिरनं मला त्याच्यासोबत बसायला सांगितले होते. माधवन हा काही जास्त दारु पित नाही. मात्र आमच्या बरोबर बसला. जेव्हा आम्ही त्या सीनसाठी तयार झालो तेव्हा आम्ही तिघेही नशेत होतो. मात्र तो सीन चांगला झाला होता. अशीही आठवण शर्मननं सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.