Tunisha Sharma Death: जामीनासाठी शिझानची मुंबई कायकोर्टात धाव, FIR रद्द करण्याची केली मागणी

शिजान सध्या ठाणे कारागृहात अटकेत आहे .
sheezan khan, tunisha sharma, sheezan khan arrested, tunisha sharma death
sheezan khan, tunisha sharma, sheezan khan arrested, tunisha sharma deathSAKAL
Updated on

टीव्ही अभिनेता शीझान खानवर त्याची सह-अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. शीझानने नुकतंच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याच्यावरील एफआयआर रद्द करण्याची आणि त्याला जामिनावर सोडण्याची मागणी केली. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला, वसई सत्र न्यायालयाने २८ वर्षीय शीझान खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. शिजान सध्या ठाणे कारागृहात अटकेत आहे .

sheezan khan, tunisha sharma, sheezan khan arrested, tunisha sharma death
Tunisha Case: शीजनला जेल की जामीन? वसई न्यायालय 13 जानेवारी रोजी जामिनावर देणार निकाल

शीझान खानसोबत 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही शोमध्ये तुनीषा शर्माने काम केले होते. 24 डिसेंबर ला मुंबई बाहेरील वसईजवळ एका हिंदी मालिकेच्या सेटवर वॉशरूममध्ये तुनिशा लटकलेल्या अवस्थेत सापडला सापडली. त्यामुळे सर्वांना धक्का बसला.

तुनीषा शर्मा अभिनेता शिझान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यांचे ब्रेकअप झाले होते. शिझानला तिच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती आणि सध्या तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

याशिवाय रिलेशनशिप आणि ब्रेकअप या नॉर्मल गोष्टी आहेत त्यामुळे तुनिषाच्या आत्महत्येसाठी मला जबाबदार धरू नये, अशी मागणी शिझानने त्याच्या अर्जात केली आहे.

यापूर्वी 9 जानेवारी रोजी शीझानच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा शीझानच्या वकिलाने दावा केला होता की, आत्महत्येपूर्वी तुनिषा 'अली' नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती, दोघांची ओळख डेटिंग अॅपद्वारे झाली होती. आत्महत्येच्या 15 मिनिटांपूर्वी तुनिषाने अलीशी व्हिडिओ कॉलवर बोलल्याचा दावाही करण्यात आला होता.

sheezan khan, tunisha sharma, sheezan khan arrested, tunisha sharma death
Rakhi Sawant Arrested: राखी नरमली, तुरुंगात जायला घाबरली, जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव

तुनिषाच्या आईने दिलेल्या एका मुलाखतीत या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आणि तिला डेटिंग अॅपबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. तसेच, अली हा तुनिषाचा जिम ट्रेनर होता आणि ते फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. शिझानने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला असून त्याचा FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. आता शिझान तुरूंगातुन सुटणार कि त्याची पोलीस कोठडी वाढणार, याचा फैसला लवकरच होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.