'माझा अकरा वर्षांचा मुलगा गेला, तेव्हा फक्त शाहरुखच होता जो'...

बॉलीवूडमध्ये (bollywood) सध्या खळबळजनक वातावरण आहे. त्याला कारणही तसचं आहे.
'माझा अकरा वर्षांचा मुलगा गेला, तेव्हा फक्त शाहरुखच होता जो'...
Updated on

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) सध्या खळबळजनक वातावरण आहे. त्याला कारणही तसचं आहे. किंग खान (king khan) शाहरुखचा मुलगा आर्यन खान (aryan khan) हा त्याच्यावर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो एनसीबीच्या कोठडीत आहे. त्याला जामीन मिळावा म्हणून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र अजून त्याला यश आलेले नाही. अशावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखला सपोर्ट केला आहे. त्यात ख्यातनाम अभिनेते आणि अभिनेत्रींचाही समावेश आहे. सलमान खान, सुनील शेट्टी, दिग्दर्शक हंसल मेहता, अभिनेत्री पूजा भट्ट, फराह खान यांनी आर्यन खानची बाजू घेतली आहे. अभिनेता ऋतिकनं देखील आर्यनची बाजू घेऊन त्याच्यासाठी भलीमोठी पोस्ट शेयर केली आहे.

सध्या प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक शेखर सुमन यांचा एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी शाहरुखच्या प्रती काळजी व्यक्त केली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये शाहरुखच्या मोठेपणाचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माझा मोठा मुलगा आयुष हा अकरा वर्षांचा असताना तो अचानक गेला. त्यावेळी मला मोठा धक्का बसला. तेव्हा मला त्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी आधार देणारा एकमेव अभिनेता शाहरुख होता. बॉलीवूडचा एकमेव अभिनेता जो मला पर्सनली भेटायला आला. आणि त्यानं माझी विचारपूस केली. अशाप्रकारे शेखर सुमन यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.

शेखर सुमन यांनी व्टिटरव्दारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. मला जेव्हा कळलं की त्याच्या मुलाला अटक झाली आहे तेव्हा मला धक्काच बसला. हे वाईट आहे. एक पालक म्हणून सध्या शाहरुख कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे मला कळतंय. मी त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी त्याला माझा पाठींबा जाहीर करतो आहे. तेव्हा शेखर सुमन यांनी आपल्या त्या प्रसंगाविषयी एक आठवण शेयर केली आहे. त्यात त्यांनी मुलगा गेल्यानंतर कशाप्रकारे शाहरुख आपल्या भेटीला आला होता हे त्यानं सांगितलं आहे.

'माझा अकरा वर्षांचा मुलगा गेला, तेव्हा फक्त शाहरुखच होता जो'...
"खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"
'माझा अकरा वर्षांचा मुलगा गेला, तेव्हा फक्त शाहरुखच होता जो'...
Drug case: रिया, दिपीकानंतर आता पुढचं टार्गेट शाहरुख - मलिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.