Swachhata Hi Seva Abhiyan: विसर्जनानंतर श्रेयस तळपदेकडून वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेसाठी श्रमदान!

Actor Shreyas Talpade participates in cleanliness drive  Swachhata Hi Seva Campaign at Versova Chowpatty
Actor Shreyas Talpade participates in cleanliness drive Swachhata Hi Seva Campaign at Versova Chowpatty Esakal
Updated on

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीच्या एक दिवसापुर्वी मोदी सरकार देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबवत आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘स्वच्छतेसाठी श्रमदान’ कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत आहे यात सामान्य नागरीकांसह अनेक राजकिय नेते आणि कलाकार मंडळींनीही सहभाग घेतला.

Actor Shreyas Talpade participates in cleanliness drive  Swachhata Hi Seva Campaign at Versova Chowpatty
Disha Patani: "तू जिथेही असशील..", दिशाला जेव्हा येते सुशांतची आठवण

सप्टेंबरच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले होते.

या श्रमदानासाठी पीएम मोदींनी एक तारीख, एक तास, एक साथ असा नारा दिला आहे. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. असं त्यांनी सांगितलं. आजच्या मोहिमेसाठी देशभरातील 6.4 लाख ठिकाणांची निवड करण्यात आली आहेत.

Actor Shreyas Talpade participates in cleanliness drive  Swachhata Hi Seva Campaign at Versova Chowpatty
BO Collection Day 3: चुचा - हनीचा जुगाड यशस्वी! फुक्रे 3 ने वीकेंडला जमवले इतके कोटी! 'द वॅक्सीन वॉर' अन् 'चंद्रमुखी 2' ला धोबीपछाड

स्वच्छता ही सेवा हे अभियानाला देशवासीयांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी ही स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. तर मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर महानगरपालिकेच्या पश्चिम विभाग आणि एकता मंच यांच्या विद्यमाने स्वच्छता ही सेवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

Actor Shreyas Talpade participates in cleanliness drive  Swachhata Hi Seva Campaign at Versova Chowpatty
Shyamchi Aai: दिवाळीत भेटायला येणार श्यामची आई! मुळशी पॅटर्न मधील हा कलाकार साकारणार प्रमुख भुमिका

याठिकाणी सामान्य देशवासीयांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील सहभाग घेतला होता. यात मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे, नील नितीन मुकेश यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आणि समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता केली.

यावेळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील शेकडो नागरिक देखील या स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.