आज स्टार अभिनेता याचं श्रेय 'माझ्या झोपडपट्टीला!' - सिद्धार्थ भावूक

'आयुष्य आणि करिअर' अशा दोन्ही गोष्टींवर मनमोकळा संवाद अभिनेत्यानं ई सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत साधला आहे.
Siddharth Jadhav
Siddharth JadhavGoogle
Updated on

मराठी इंडस्ट्रीतला अवलिया कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). अभिनय क्षेत्रात एकांकिकांपासून सुरु झालेला त्याचा प्रवास थेट बॉलीवूडपर्यंत जाऊन पोहोचला आहे. अनेक नाटक,मालिका,सिनेमा अशा माध्यमातून वावरताना त्यानं नेहमीच प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद मिळवली आहे. 'ईसकाळ'ला दिलेल्या पॉडकास्ट(Podcast) मुलाखतीत त्यानं विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला आहे. पण ही मुलाखत नेहमीपेक्षा नक्कीच वेगळी म्हणावी लागेल. आता आपल्या सर्वांना हे तर माहित असावं कदाचित की सिद्धार्थ जाधव शासनाच्या व्यसनमुक्ती अभियनाचा ब्रॅंड अॅम्बेसिडर आहे. पण या पॉडकास्ट मुलाखतीत मात्र त्यानं व्यसनांपासून आपण कसे व का दूर राहिलो याचं जे कारण सांगितलंय किंवा ज्या गोष्टीला त्याने याचं क्रेडिट दिलंय ते का? हे ऐकाल तर नवलंच कराल. पण ते एक्सक्लुसिव्ह कारण ऐकायला आपल्याला सकाळ पॉडकास्टला त्यानं दिलेली ही मुलाखत ऐकावी लागेल. इथे बातमीत त्या मुलाखतीची लिंक जोडली आहे.

सिद्धार्थ जाधवची ही एक्सक्लुसिव्ह सकाळ पॉडकास्ट मुलाखत आपण इथे ऐकू शकाल....सिनेइंडस्ट्रीत नाइट पार्टी एन्जॉय करणारा सिद्धार्थ का राहिला व्यसनांपासून दूर? जाणून घ्या...

सिद्धार्थ छोट्या पडद्यावर सध्या 'हे तर काहीच नाही' या शो मध्ये आपल्याला दिसत आहे. या शो मध्ये अनेक सेलिब्रिटी येतात अन् आयुष्यातले अनेक किस्से आपल्यासोबत शेअर करतात. तिथे सिद्धार्थ त्यांना खुलवण्याचं,त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम करतो. अर्थात हे सूत्रसंचालन नव्हे,त्यापेक्षा एक वेगळी भूमिका त्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं तो साकारत आहे. या मुलाखतीत हा कार्यक्रम करण्यासाठी आधी आपण नकार कळवला होता असं तो म्हणाला,पण काय झालं असं की तो नकार होकारामध्ये बदलला ते देखील त्यानं या मुलाखतीत शेअर केलं आहे. याच कार्यक्रंमात शेवटचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव चित्रिकरणासाठी आले होते. त्यांच्याविषयी बोलताना भावूक झालेला सिद्धार्थही या मुलाखतीच्या माध्यमातून आपणास ऐकता येईल.

Siddharth Jadhav
Video: लहानग्या परीनं अशी साजरी केली शिवजयंती,दिली अनोखी मानवंदना

याच मुलाखतीत त्यानं रणवीर सिंगसोबत असलेल्या आपल्या नात्यावरही मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. तर आजच्या तरुण पिढीला त्यानं एक चांगला संदेशही दिला आहे. माझ्याकडे रुप नव्हतं पण तरिही मला मुख्य भूमिका साकारायला मिळाल्या. त्यासाठी त्यानं नेमकं काय केलं यातलं मॅजिक आजच्या तरुण पिढीसमोर त्यानं या मुलाखतीत बोलून दाखवलं आहे. एक वाक्य त्यानं अगदी सुंदर म्हटलं आहे,''मला गोडाऊन मधून शो रुम मध्ये आणायचं काम केलं दिग्दर्शक केदार शिंदेनं आणि शो रुममधून जगासमोर आणलं महेश मांजरेकर यांनी''....पण हे सांगताना महेश मांजरेकरांना आपण घाबरतो याची कबुलीही त्यानं दिली आहे. चला,तर मग सिद्धार्थ जाधवनं ईसकाळला दिलेली ही दिलखुलास पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका. वर बातमीत लिंक जोडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.