सोनुच्या नावानं मटणाचं दुकान, 'पण मी तर शाकाहारी'...

सोनुच्या (sonu sood) लोकप्रियतेचे उदाहरण देणारी एक घटना नुकतीच दिसून आली आहे.
sonu sood
sonu sood Team esakal
Updated on

मुंबई - बॉलीवूडचा अभिनेता सोनु सूद (bollywood actor sonu sood) त्याच्या मदतशील स्वभावासाठी प्रसिध्द आहे. त्यानं त्याच्या फाऊंडेशनच्या निमित्तानं हजारो जणांची मदत केली आहे. कोरोनाच्या काळात सोनूनं लोकांना दिलेला मदतीचा हात मोठा आधार ठरला आहे. सोनु हा सोशल मीडियावर (active on social media) अॅक्टिव्ह असणारा अभिनेता आहे. त्याचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. तो नेहमी चर्चेतही असतो. त्याचे कारण त्यानं केलेली मदत. सामाजिक सहकार्याचा वसा त्यानं जपण्याचे ठरवले आहे. मात्र अनेकदा त्याचे चाहते त्याच्याविषयी जो आदर आणि प्रेम दाखवतात त्याला तोड नसते. (actor sonu sood reaction on mutton shop named after him says i am vegetarian)

सोनुच्या (sonu sood) लोकप्रियतेचे उदाहरण देणारी एक घटना नुकतीच दिसून आली आहे. दक्षिणेकडील एका राज्यातील सोनुच्या चाहत्यानं चक्क त्याच्या नावाचे मटणाचे दुकान सुरु केले आहे. त्यावरुन सोनुनं सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली आहे. जी मोठ्या प्रमाणावर व्हायरलही झाली आहे. सोनुनं त्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. ती त्याच्या चाहत्यांना आवडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनु कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. (helping to corona patient)

तेलंगाणातील करीमनगर मध्ये त्याच्या नावाचे मटण शॉप सुरु करण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सोनुनं सांगितले आहे की, माझ्या नावानं मटणाचे दुकान आहे? हे ऐकुन मला धक्काच बसला आहे. पण मला एक सांगायला हवे की, मी शाकाहारी आहे. (i am a vegitarian) मी शाकाहारी हॉटेल सुरु करण्यासाठी अशा लोकांना नक्कीच मदत करेल. सध्या सोनुनं कोरोनाच्या वाढता प्रसार लक्षात घेता कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

sonu sood
बिग बी यांना एवढा राग का आलायं?
sonu sood
'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'

त्यानं काही दिवसांपूर्वी एक व्टिट केले होते. त्यात म्हटले होते की, येत्या जून महिन्यात कुरनुल रुग्णालयामध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रर यंत्र बसविण्यात येणार आहे. हे सांगायला मला आनंद होतो आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रीत करायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.