"...म्हणून हे धजावतात"; राज्यपालांच्या वक्तव्यावरुन सुबोध भावे संतप्त!

लायकी नसलेल्यांच्या हाती आपण देश उभारणीचं काम दिलंय, असंही सुबोध भावेंनी म्हटलं आहे.
Subodh Bhave Bhagatsingh Koshyari
Subodh Bhave Bhagatsingh KoshyariSakal
Updated on

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या एका विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यांच्या विधानावरुन त्यांच्यावर सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेकांनी टीका केली आहे. अभिनेते सुबोध भावेनीही राज्यपालांच्या या वक्तव्यावरुन सुनावलं आहे.

Subodh Bhave Bhagatsingh Koshyari
लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हाती आपण देश उभारणीचं काम दिलंय - सुबोध भावे

पुण्यातल्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुबोध भावे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतात, हे आपल्या समोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभं करणं गरजेचं आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणून 'मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत', अशी वक्तव्ये करण्यात काही राजकारणी धजावतात".

तसंच त्यांनी राजकारण्यांवर टीकाही केली आहे. आपण सगळे चांगलं शिक्षण घेऊन सतत करियरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलं आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.