'अब आएगा मजा..' आरे कारशेड विषयी सुमीत राघवनचं 'हे' ट्विट होतंय व्हायरल..

मेट्रोचा कार्यभार अश्विनी भिडेंकडे यांच्याकडे येताच अभिनेता सुमीत राघवन याने ट्विट केलं आहे.
(actor sumeet raghvan shared post for ashwini bhide about metro posting   he supports aarey carshed and against aarey protest)
(actor sumeet raghvan shared post for ashwini bhide about metro posting he supports aarey carshed and against aarey protest)sakal
Updated on

save the aarye : महाराष्ट्रातला राजकीय गोंधळ आता कुठे शांत झाला असतानाच 'आरे'चा वाद चिघळू लागला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यावरण प्रेमींच्या अंदोलनानंतर आरे येथे होणाऱ्या मेट्रो 3 कारशेडला स्थगिती दिली गेली. परंतु आता फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येताच त्यांनी पुन्हा आरे येथेच कारशेड होणार असल्याचे जाहीर केले. याचे पडसाद म्हणून पुन्हा एकदा 'आरे बचाव' आंदोलनाने जोर घेतला आहे. पण दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन (sumeet raghvan) मात्रा आरे आंदोलकांच्या विरोधात आहे. दर काही दिवसांनी तो आरे बचाव आंदोलकांविरोधात ट्विट करत आहे. आता त्याने केलेले तर ट्विट जरा जास्त धक्कादायक आहे. 'अब आयेगा मजा' म्हणत त्याने एक ट्विट केले आहे.

(actor sumeet raghvan shared post for ashwini bhide about metro posting he supports aarey carshed and against aarey protest)

(actor sumeet raghvan shared post for ashwini bhide about metro posting   he supports aarey carshed and against aarey protest)
Emergency Teaser: कंगना साकारणार 'इंदिरा गांधी', 'एमरजन्सी'चा टीझर रिलीज..

‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र, मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन मात्र, आरे आंदोलकांच्या विरोधात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘कारशेड वही बनेगा’ म्हणत ट्विट केले होते. त्यानंतर आरेमध्ये आंदोलन झाले, या आंदोलनानंतर पुन्हा त्याने ट्विट करत आंदोलकांवर निशाणा साधला होता. 'झाडाला मिठी मारून बसण्यापेक्षा स्वतःच्या पैशाने समाजासाठी काहीतरी करा'असे त्याने ट्विट केले होते. आता त्याने थेट आनंद व्यक्त केला आहे. त्याचे कारणही खास आहे.

(sumeet raghvan on aarey protest) (sumeet raghvan tweet)

मेट्रोच्या बांधकामा बाबत एक मोठी घटना घडली, ती म्हणजे अश्विनी भिडे यांना मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार देण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या काळात तो पदभार आधी त्यांच्याकडेच होता. ठाकरे सरकारने मात्र त्यांना मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्या मेट्रोच काम पाहणार असल्याने सुमीतने अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे. तो ट्विट मध्ये म्हणतो, 'अब आएगा मजा.. मला कायम असे वाटायचे की हा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाताना तुम्ही तिथे असायला हव्यात आणि आता तुम्ही तिथेच आहात. मुंबईकर तुमच्या प्रतीक्षेत होते' असं त्याने म्हंटलं आहे. सुमीतची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. (ashwini bhide again come back at metro corporation)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.