कारशेड 'आरे'तच.. सुमीत राघवनचे शिंदे सरकारला समर्थन.. ट्विट करत म्हणाला..

मेट्रो कारशेड पासून आरेचं जंगल वाचवण्यासाठी एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन याने 'आरे'तच कारशेड होणार असा नारा दिला आहे.
actor sumeet raghvan support metro carshed 3 in aarey forest decision by devendra fadanvis and eknath shinde
actor sumeet raghvan support metro carshed 3 in aarey forest decision by devendra fadanvis and eknath shinde sakal
Updated on

save the aarye : एका मोठ्या राजकीय गदारोळानंतर महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले खरे. पण महाराष्ट्रातला गोंधळ काही थांबत नाही. राजकीय वादानंतर आता 'आरे'चा वाद वर आला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यावरण प्रेमींच्या अंदोलनानंतर आरे येथे होणाऱ्या करशेडला स्थगिती दिली होती. परंतु आता फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येताच त्यांनी पुन्हा आरे येथेच कारशेड होणार असल्याचे जाहीर केले. याचे पडसाद म्हणून पुन्हा एकदा 'आरे बचाव' या आंदोलनाची मोर्चे बांधणी होत आहे. अशातच अभिनेता सुमीत राघवन (sumeet raghvan) याने मात्र 'आरे' येथे कारशेड करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यासंदर्भात त्याने ट्विट केले आहे.

(actor sumeet raghvan support aarey carshed)

(sumeet raghvan support metrol carshed 3 in aarey forest decision by devendra fadanvis and eknath shinde)

महाविकास आघाडीला जेरीस आणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले खरे पण आता त्यांनी आपला मोर्चा ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय पुसण्याकडे वळवला आहे. मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी 'आरे' येथे मेट्रो तीनचे कारशेड होणार असे जाहीर केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले. पर्यावरण प्रेमींनी प्राणांची बाजी लावून लढा दिला. अखेर फडणवीस सरकार गेले आणि ठाकरे सरकार आले. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'आरे' येथील करशेड रद्द करून ते कांजुर येथे हलवण्याचे ठरवले. त्यांनंतर मिटलेला वाद फडणवीस यांचे सरकार येताच पुन्हा वर आला आहे.

शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis government) सरकार आल्यानंतर मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्ज) साठीचं कारशेड आरेमध्येच बनणार या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. आणि समस्त पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला. जंगल वाचवण्यासाठी पुन्हा लढा देऊ, या भूमिकेत सध्या ते आहेत. अनेक कलाकारांकडून पण आरे वाचवण्यासाठी पाठिंबा दिला जात आहे पण अभिनेता सुमीत राघवन याने विरोधी भूमिका घेतली आहे. 'कारशेड आरेतच होणार' असे ट्विट त्याने केले आहे.

(Sumeet raghvan supporting Aarey car shed decision)

आज (3 july) सकाळी आरे मध्ये एक आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनासाठी एकत्र या असे आवाहन करणारे कुर्ल्यातील एका संस्थेचे पोस्टर शेयर करत सुमीत म्हणतो, 'एक वेगळा voice ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे. आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला @MumbaiMetro3 ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा carshed चा,तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच.' असे ट्विट करत त्याने आरे कारशेडला पाठिंबा दर्शवला आहे.

शिवाय त्याने ट्विट द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंतीही केली आहे. 'देवेंद्रजी आणि शिंदे साहेब मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा,जीव,वेळ..काही किंमत आहे की नाही?' असे सुमीतचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.