Suniel Shetty: स्विगी, झोमॅटोला बॉलीवुडचा अण्णा देणार आव्हान; सुनील शेट्टीनं सुरू केला नवा व्यवसाय..

हॉटेल व्यवसायानंतर सुनील शेट्टीचं पुढचं पाऊल..
Actor Suniel Shetty launches food delivery app Waayu
Actor Suniel Shetty launches food delivery app Waayusakal
Updated on

Suniel Shetty Food Delivery App Waayu: बॉलीवूडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी. एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता. सुनीलने त्याच्या कारकिर्दीत १०० हून चित्रपट केले. एक काळ असा होता की चित्रपटात सुनील शेट्टी असेल तर चित्रपट हीट व्हायचे. आजही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.

आज सुनील मोठ्या प्रमाणात चित्रपटात दिसत नसला तरी पडद्यामागून तो बराच सक्रिय असतो. केवळ चित्रपट विश्वातच नाही तर अण्णाचा हॉटेल व्यवसायातही मोठा हात आहे. आता त्याही पुढे जाऊन त्याने त्याच्या नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. त्याचा नवा व्यवसाय हा 'स्विगी' आणि 'झोमॅटो'ला टक्कर देणारा आहे. जाणून घेऊया त्याच्या नव्या व्यवसायाविषयी..

(Actor Suniel Shetty launches food delivery app Waayu)

Actor Suniel Shetty launches food delivery app Waayu
Siddharth Jadhav: सिध्दार्थ जाधवने शेअर केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचे फोटो, म्हणाला..

अभिनेता सुनील शेट्टीने नुकतीच आपल्या नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. नुकतेच त्याने नवीन फूड डिलिव्हरी ॲप लॉन्च केले आहे. 'वायू' असे या ॲपचे नाव असून त्याची खासियत म्हणजे, हा ॲप झोमॅटो आणि स्विगी पेक्षा कमी दरात आणि चांगल्या दर्जाचे जेवण देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

घरपोच जेवण पोहोचवणाऱ्या 'झोमॅटो' आणि 'स्विगी' या फूड डिलेव्हरी कंपनीपेक्षा कमी दरात आणि चांगल्या दर्जाचे जेवण देणार असल्याचा निर्धार सुनील शेट्टीचा नव्या व्यवसायाने केला आहे. ते इतर ॲग्रीरेटर्स ॲपपेक्षा १५% ते २०% स्वस्त उपलब्ध करून देणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वायू ॲपच्या माध्यमातून अनेक हॉटेल रेस्टॉरंट आणि ऑनलाईन डिलेव्हरी सर्व्हिस करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न हा ॲप करणार आहे. अभिनेता आणि व्यावसायिक सुनिल शेट्टीची या ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड केली असून या ॲपमधील काही हॉटेल्समध्ये त्याची गुंतवणूक देखील आहे.

वायू ॲप हा Destec Horeca चा एक भाग असून त्याची स्थापना उद्योजक अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे यांनी केली आहे. वायुला मुंबईस्थित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR)आणि इतर उद्योग संस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे. वायू ॲपसोबत मुबंईतील भगत ताराचंद, महेश लंच होम, केळीचे पान, शिवसागर, गुरु कृपा, कीर्ती महल, फारसी दरबार आणि लाडू सम्राट सोबत अनेक मुंबईतील रेस्टॉरंट्स जोडले आहेत..

मीडिया रिपोर्टनुसार, वायू ॲप (WAAYU)रेस्टॉरंट्सकडून कोणतेही कमिशन शुल्क आकारणार नाही. यामुळे, रेस्टॉरंट्स ग्राहकांना योग्य दरात जेवण देण्याची सोय उपलब्ध करून देत आहेत. इतर फूड डिलेव्हरी ॲप्सपेक्षा हा ॲप स्वस्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.