The Kerala Story Box Office: वाद अन् पाठिंब्यांच्या सत्रात कमाईचा वेग सुरुच ! द केरळ स्टोरीनं 13 व्या दिवशीही कमावले..

दुसऱ्या वीकेंडलाच या चित्रपटाने जवळपास 150 कोटींचा टप्पा पार केलेला हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा आकडा पार करू शकतो असा विश्वास चाहत्यांना आहे.
The Kerala Story
The Kerala Story Esakal
Updated on

The Kerala Story Box Office Collection Day 13: 'द केरळ स्टोरी' 5 मे रोजी बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांनाच चित्रपटाला पाठिंबा देखील खुप मिळाला. इतकच नाही तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील केली.

साधारणत: चित्रपट रिलिज झाल्यानंतर जास्तीत जास्त दहा दिवस चित्रपट कमाई करतो. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा आलेख हा कमी होतो. मात्र द केरळ स्टोरी बद्दल बोलायचं झालं तर यात उलट चित्र पाहायाला मिळत आहे.

जसे जसे चित्रपटाला रिलिज होवुन जास्त दिवस होत आहेत. तसचं चित्रपटाची कमाई वाढतांनाच दिसत आहे.

The Kerala Story
Inspector Avinash: आता हेच व्हायचे होते राहिले बाकी! राधे माँ चा मुलगा होणार 'हिरो'

चित्रपट प्रदर्शित होऊन 13 दिवस झाले आहेत. आताही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कोरोना महामारीनंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत केरळ स्टोरी ने चौथ्या क्रमांकावर आपलं स्थान निश्चित केलं आहे.

दुसऱ्या वीकेंडलाच या चित्रपटाने जवळपास 150 कोटींचा टप्पा पार केलेला हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा आकडा पार करू शकतो असा विश्वास चाहत्यांना आहे.

The Kerala Story
Mahendra Singh Dhoni : धोनीच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी! होणार कारवाई, काय आहे प्रकरण?

5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या केरळ स्टोरीने पहिल्याच दिवशी 8.50 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपले खातं उघडले. दुसरीकडे, गेल्या आठवड्यातील वीकेंड कलेक्शनबद्दल सांगायचे तर, द केरळ स्टोरीने शुक्रवारी, 12 मे रोजी देशभरात 12.35 कोटींची कमाई केली. त्याच वेळी, शनिवारी 19.50 कोटी आणि रविवारी 23.75 कोटी कमावले.

17 मे रोजी म्हणजेच बुधवारी आकड्यांनुसार केरळ स्टोरीने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 9.25 कोटींची कमाई केली. यासह, The Kerala Story ने देशभरात 13 दिवसात जवळपास 165.94 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केल आहे.

The Kerala Story
Alia Bhatt Trolled : 'एवढी मोठी अभिनेत्री तू रिकामी पर्स घेऊन गेलीस!'

 'द केरळ स्टोरी'  याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.


The Kerala Story
The Kerala Story : 'मुली सहजपणे त्यांच्या जाळ्यात अडकतात! हे तुम्हाला माहिती आहे का?'

त्याचबरोबर इतर देशांमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑस्ट्रेलियात चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे. चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन पाहता, द केरळ स्टोरी विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाशी बरोबरी करू शकते, असं मानलं जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()