Vikram Gokhale: 'माहेरची साडी' चित्रपटाच्या सेटवर विक्रम काका.. अलका ताईंनी सांगितली खास आठवण

'माहेरची साडी' या चित्रपटात अलका कुबल यांच्या वडिलांची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली होती.
actress alka kubal shared memory about vikram gokhale on set of maherchi sadi movie
actress alka kubal shared memory about vikram gokhale on set of maherchi sadi moviesakal
Updated on

vikram gokhale passes away: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शोकाकुल झालेले अनेक कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशीच एक आठवण अभिनेत्री अलका कुबल यांनी 'सकाळ' डिजिटलची बोलताना सांगितली.

(actress alka kubal shared memory about vikram gokhale on set of maherchi sadi movie)

actress alka kubal shared memory about vikram gokhale on set of maherchi sadi movie
Vikram Gokhale Passes Away: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन..

अलका ताई आणि विक्रम गोखले यांनी 'माहेरची साडी' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. विक्रम गोखले या चित्रपटात अलका कुबल यांच्या वडीलांच्या भूमिकेत होते. त्याकाळी या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले होते. प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. तेवढं तेव्हाच नाही तर आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याच चित्रपटाच्या सेटवरची आठवण अलका ताईंनी सांगितली आहे.

actress alka kubal shared memory about vikram gokhale on set of maherchi sadi movie
Kris Wu: बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध पॉपस्टार 'क्रिस वू' याला 13 वर्षांचा तुरुंगवास; 17 वर्षीय तरुणीवर..

त्या म्हणाल्या, 'माहेरच्या साडी हा चित्रपट आम्हा दोघांसाठीही तितकाच महत्वाचा आहे. कारण त्या चित्रपटात आम्ही बाप-मी लेकीच्या भूमिकेत होतो. तेव्हापासून जुळलेले नाते विक्रमजींनी कायम आपुलकीने जपले. त्यावेळी आम्ही सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ११ या वेळात शूट करायचो. त्या टीम मध्ये विक्रमजी,. आशालता ताई, उषा नाडकर्णी अशी दिग्गज मंडळी होती. तेव्हाही मनोरंजन विश्वात विक्रमजींचा प्रचंड दरारा होता. पण सेटवर मात्र ते तरुण मुलांशी, जुनियर कलाकारांशी एखाद्या मित्राप्रमाणे वागायचे. प्रत्यक्ष आपुलकीने बोलायचे.'

त्यांनी कधीही त्यांच्या वयाचा, कामाचा, अनुभवाचा गर्व केला नाही. ज्येष्ठत्व- श्रेष्ठत्व असूनही सेटवर त्यांचा वावर अगदी सहज असायचा. ते कुणासोबतही बसायचे, बोलायचे. एवढंच नाही तर मधल्या वेळेत आम्ही कॅरम खेळायची, पत्ते खेळायचो. अगदी नाईट आउट, डान्स करणे, गाणी म्हणणे यातही विक्रमजी उत्साहाने सहभागी व्हायचे. त्यामुळे त्यांचा वावर कायमच प्रत्येकाला हवाहवासा वाटायचा,' अशी भावना अलका त्यांनी व्यक्त केली.

पुढे त्या म्हणाल्या, 'या वयातही कलाकारांची नवी पिढी घडवण्यासाठी ते प्रयत्न करत होते, मेहनत घेत होते. अगदी त्यांच्या हातात माईक दिला तर ते अनुभवाचं मोठेपण बाजूला ठेवून निवेदनही करायला उठायचे. त्यांची ऊर्जा, यांची सामाजिक काम करण्याची जिद्द, समाजाप्रती असलेली आस्था, असं खूप काही त्यांच्याकडून शिकता आलं. त्यामुळे विक्रमजी कायम स्मरणात राहतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.