Maasa Short Film : मराठी चित्रपटांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटत असतानाच एक आनंदाची बातमी मनोरंजन विश्वाला मिळाली आहे. गेल्या काही वर्षात चित्रपटाप्रमाणे लघुपट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय त्याला मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत आहे. असाच एक लघुपट आता चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री अमृता सुभाष (amurta subhash)हिचा 'मासा' हा लघुपट परदेश वारीला जाणार आहे. थेट कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिसमध्ये 'मासा'चे स्क्रिनींग होणार आहे.
लॉस एंजलिस मध्ये होणाऱ्या हॉलीवुड इंटरनॅशनल डायव्हरसिटी फिल्म फेस्टिवल (Hollywood International Diversity Film Festival) मध्ये 'मासा' या लघुपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. 13 ऑगस्ट रोजी हे स्क्रिनिंग होणार आहे. हॉलीवूडमधील कॉम्प्लेक्स थिएटर्स आणि स्टुडिओमध्ये पॅसिफिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता हे स्क्रिनिंग होईल. या लघुपटामध्ये अभिनेत्री अमृता सुभाषनं प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरनं या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर प्रज्ञा दुगल, तेज दुगल आणि फुलवा खामकर, अमर खामकर यांच्या पी.एस.डी.जी स्टुडिओज या प्रोडक्शन हाऊसनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संदेश कुलकर्णी यांनी या लघुपटाचं कथानक लिहिलं आहे.
फुलवा खामकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या फिल्म फेस्टिव्हलची माहिती दिली आहे. फुलवानं शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. मराठी शॉर्ट फिल्म साता समुद्रापार जाणार असल्याने सर्वांनाच मोठा आनंद मिळाला आहे. अमृताने आता बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहेच आता या निमित्ताने हॉलिवूड मध्येही तीचा डंका वाजेल असे दिसते आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.