Babilona's Brother Found Dead News: प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री बाबिलोना आज चर्चेत आलीय. कारण धक्कादायक आहे. बाबलोनाचा भाऊ विघ्नेश कुमार उर्फ विकीचा संशयास्पद मृत्यु झालाय. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. News 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईतील सालीग्रामम 8व्या स्ट्रीटवरील एका अपार्टमेंटमध्ये ४० वर्षीय विकी एकटाच राहत होता.
(Actress Babilona's Brother Found Dead At His Apartment Under Mysterious Circumstances)
विकीच्या एका मित्राने त्याला भेटण्यासाठी नुकतीच घरी भेट दिली. कारण विकीने सकाळपासून मित्राचा फोन उचलला नव्हता. त्याच्या मित्राने मीडियाला सांगितले की, विकीच्या घराचा दरवाजा आतून जाम होता आणि त्याने बराच वेळ ठोठावूनही तो उघडला नाही. त्यामुळे त्याला संशय आला आणि त्याने तत्काळ विरुगंबक्कम पोलीस ठाण्यात माहिती दिली.
विकी गेल्या अनेक वर्षांपासून या अपार्टमेंटमध्ये एकटाच राहत होता आणि त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या पोलिसांना सापडल्या आहेत. विकीचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे झाला की अन्य कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत. (Latest Entertainment News)
आतापर्यंतच्या वृत्तानुसार, तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. विकीचा पोलिस ठाण्यात मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर अनेक गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. अनेक चित्रपट सेलिब्रिटींशी वादविवाद केल्यामुळे त्याला अटक आणि तुरुंगात टाकण्यात आले होते.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला. विकीचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पोलिसांना सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील अराकोनम तालुक्यात असलेल्या किलपक्कम गावातील सरकारी रुग्णालयात पाठवला. (Latest Marathi News)
शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, विकीची आई माया यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूचा संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या संशयास्पद मृत्यूची पाहणी करणाऱ्या विभागांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. वृत्तानुसार, पूर्वीच्या वैमनस्यातून कोणीतरी विकीची हत्या केली असावी, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
वृत्तानुसार, विक्कीला पोलिसांनी काही दिवसांपुर्वी चेन्नईच्या वालासारवक्कम येथे अटक केली होती. दारूच्या नशेत अशांतता निर्माण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.