Jacqueline Carrieri: प्लास्टिक सर्जरीमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीला गमवावा लागला जीव! 48 व्या वर्षी ब्युटी क्वीनचे निधन

Argentine Actress-Beauty Queen Jacqueline Carrieri Dies
Argentine Actress-Beauty Queen Jacqueline Carrieri DiesEsakal
Updated on

Argentine Actress-Beauty Queen Jacqueline Carrieri Dies: मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री,मॉडेल वाढत्या वयात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आपल्या डायटिंगवर विषेश लक्ष देतात.

अशातच काही वेळी वाढत्या वयाचा आपल्या सौंदर्यावर परिणाम होऊ नये म्हणुन अभिनेत्री अनेक वेळा चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करत असतात.

मात्र चुकीची सर्जरी झाल्यामुळे अभिनेत्रींना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. असचं काहीस आताही झालं आहे.

Argentine Actress-Beauty Queen Jacqueline Carrieri Dies
Pushkar Jog: "कायदा जरी आपल्या विरुद्ध गेला तरीही", पुष्करने लेकीसाठी केलेली पोस्ट चर्चेत, काय घडलंय नेमकं?

माजी ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री जॅकलीन कॅरीरी चे वयाच्या ४८ व्या वर्षी कॉस्मेटिक सर्जरीमुळे निधन झाले. अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. तिच्या शरीरातील रक्त गोठल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तर अर्जेंटिना मीडियाच्या अहवालानुसार बऱ्याच वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाल्याने तिच्या शरीरात शेवटी रक्ताच्या गाठी तयार झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाला त्यावेळी तिच्यासोबत तिचे मुले क्लो आणि ज्युलियन होते.

Argentine Actress-Beauty Queen Jacqueline Carrieri Dies
Apurva Nemlekar: "तुला गमावण्याची वेदना आयुष्यभर...", भावाच्या वाढदिवशी अपूर्वाची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

जॅकलीनच्या मृत्यूची बातमी सॅन राफेल वेंडिमियाच्या सोशल नेटवर्क्सद्वारे जाहीर करण्यात आली. जॅकलीनने ब्युटी क्वीन जिंकला होता. ती 1996 मध्ये अर्जेंटिनामधील San Rafael en Vendimia grape harvest festival सौंदर्य स्पर्धेची उपविजेती होती.

तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. यात लिहिले आहे की, "आज आम्ही आमच्या फॉलोअर्सला दुःखद बातमी कळवू इच्छितो, जॅकलिन कॅरीरी यांचे निधन झाले आहे. रेनास डी सॅन राफेलकडून आम्ही या कठीण क्षणी कुटुंब आणि मित्रांप्रती शोक व्यक्त शोक व्यक्त करतो."

Argentine Actress-Beauty Queen Jacqueline Carrieri Dies
Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ठरली बिग बॉस 17 ची महागडी स्पर्धक? घेतलं इतक्या कोटीचं मानधन!

तरुणपणा टिकवून ठेवण्यासाठी किंवा वय वाढवण्याकरता केलेल्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियांमुळे सेलिब्रिटींमध्ये अशापक्रारची गुंतागुंतीचे बरेच प्रकार यापुर्वीही घडले आहेत. रसायनांच्या अतिवापरामुळे होते, त्यांची हृदयाची गती अचानक कमी होते, छातीत दुखणे, रक्ताच्या गाठी आणि रक्तस्त्राव अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याच कलाकरांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.